Sai Tamhankar: 'लॉकडाउन'मधला संघर्ष.. फोटो शेअर करत सईने सांगितला अनुभव..

सई ताम्हणकरने 'इंडिया लॉकडाउन' या हिन्दी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा फोटो शेयर केला आहे.
Sai Tamhankar shared photo from the sets of india lockdown movie and her struggle
Sai Tamhankar shared photo from the sets of india lockdown movie and her struggle sakal
Updated on

sai tamhankar: अभिनेत्रीसई ताम्हणकर हे नाव मराठीसोबतच बॉलीवुडमध्येही झळकत आहे. सध्या तिने हिन्दी चित्रपटांचा धडाकाच लावला आहे. लवकरच ती इम्रान हाशमी सोबत ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे. तर सध्या तिच्या 'इंडिया लॉकडाउन'या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. भारतात झालेल्या टाळेबंदीचे आणि त्या दरम्यान घडेलेल्या भयावह घटनांचे चित्रण या करण्यात आले आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा एक फोटो शेयर करत सईने आपला अनुभव सांगितला आहे.

(Sai Tamhankar shared photo from the sets of india lockdown movie and her struggle )

Sai Tamhankar shared photo from the sets of india lockdown movie and her struggle
Santosh Juvekar: मुलाचा '36 गुण' चित्रपट पाहून संतोष जुवेकरचे वडील काय म्हणाले, बघाच..

सईने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो तिच्या ‘इंडिया लॉ़कडाऊन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या हातगाडीवर ती झोपली आहे. तर झोपेतच तिने एका हाताने तिने काळ्या रंगाची छत्री पकडली आहे. तर आजूबाजूला चित्रीकरण सुरू असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत सईने एक कॅप्शन पण दिले आहे.

Sai Tamhankar shared photo from the sets of india lockdown movie and her struggle
Bigg Boss Marathi 4: मनातलं प्रेम अखेर ओठावर! प्रसादनं केलं अमृताला प्रपोज..

'जेव्हा आम्ही चित्रपटाच्या सेटपासून खूप दूरच्या ठिकाणी शूटिंग करत असतो, तेव्हा असं परिस्थितीशी जुळवून घेत काम करतो. हीच जुळवून घेण्याची वृत्ती टाळेबंदीच्या काळामध्ये आपल्या कामी आली' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

या चित्रपताच्या ट्रेलरचीही बरीच चर्चा आहे. मधुर भांडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सई एका मजूराच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेता प्रतीक बब्बर तिच्या पतीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सई, प्रतीक यांच्यासह या चित्रपटामध्ये श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.