बाॅलिवूड मधील एक गाजलेले आणि आदर्श जोडपे म्हणून दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची लव्हस्टोरीही (lovestory) तितकीच प्रसिद्ध आहे. त्यांनी ११ ऑक्टोबर १९६६ रोजी लग्न केले. त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आले पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. दिलीप कुमार यांच्या वृद्धापकाळात सायरा यांनी त्यांची मनोमन सेवा केली. दिलीपजींच्या शेवटच्या काळात त्या अधिक खचल्या. गतवर्षी दिलीपजींचे निधन झाले, आता सायरा बानो यांची अवस्था अधिक बिकट झाल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या सायरा बानो एकांतवासात गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांनी सर्वांशी संबंध तोडले असून त्या कुणाचेही फोन उचलत नाहीत अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय मुमताज, धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. त्यांनी तिच्यापर्यंत अनेक वेळा पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पोहचू शकले नाहीत. यावर मुमताज म्हणाल्या, मी तर त्यांच्या पाली हिलच्या बंगल्यावर जाऊन आले पण त्यांना भेटू शकले नाही.
'हे अत्यंत वाईट आणि धक्कादायक आहे. युसूफ साब (दिलीप कुमार)यांच्या दुःखद निधनानंतर साईराजी कोषात गेल्या आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. संपर्क झाला नाही म्हणून मी त्यांच्या घरी गेले. पण मी तिला भेटू शकलो नाही. हे चित्र पाहून खूप वाईट वाटतं. मी त्या दोघांना त्यांच्या बंगल्यावर शेवटची भेटले होते ते मला आजही आठवतं,' असे मुमताज म्हणाल्या. दिलीप कुमार आणि सायरा बानो या दोघांसोबत राम और श्याम आणि आदमी और इंसान या चित्रपटांमध्ये मुमताज यांनी काम केले आहे.
धर्मेंद्र यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'कोणत्याही कॉलला उत्तर देत नाही. त्यामुळे त्या फक्त चांगल्या आहेत अशी आशा आपण करू शकतो.' तर शत्रुघ्न सिन्हा यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'दिलीप यांच्या जाण्याने त्या एकट्या पडल्या आहेत. आपण सर्वांनी फक्त एक महान अभिनेता गमावला. पण त्यांनी बरेच काही गमावले आहे. जर त्यांना आमची गरज असेल तर मी तिच्यासाठी आहे,' असे सिन्हा म्हणाले.
सायरा बानो यांनी एकदा हिंदुस्तान टाइम्सला सांगितले होते, 'माझ्यासाठी ते नेहमीच साब होते. मला आठवते तेव्हापासून मी त्यांची चाहती होते. खूप कमी वयात मी त्यांच्याशी लग्न करायचे ठरवले. मी खूप जिद्दी असल्याने मला त्यांच्याशी लग्न करायचेच होते. मला माहित आहे की, अनेक सुंदर महिलांना त्यांच्याशी लग्न करायचे होते, पण त्यांनी मला निवडले आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.