ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो का म्हणतायत,''मी खूप त्रासात आहे''

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी असं विधान केल्यामुळं वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. पण यामुळे त्यांचे चाहते मात्र हळहळलेयत.
Dilip Kumar and Saira Banu pose together at home.
Dilip Kumar and Saira Banu pose together at home.Google
Updated on

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो(Saira Banu) यांनी एक मोठं विधान केलंय ज्यामुळे त्यांचे चाहते मात्र हळहळलेयत. त्या म्हणाल्यात,''मला त्रास होतोय. माझे पती दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर मी एकाकी पडलेय''. एका मुलाखती दरम्यान हे विधान करताना त्या खूप भावूक झाल्या होत्या. त्या पुढे म्हणाल्यात,''दिलीपचं जाणं माझ्यासाठी मोठं दुःख आहे. मला तो पुन्हा हवाय माझ्या आयुष्यात''. सायरा बानो या दिलीप कुमारांच्या जाण्यानंतर घराबाहेरही पडलेल्या नाहीत. शेजार-पाजारचे,ओळखीच्यातले सोडाच, स्वतःच्या आप्तेष्टांनाही भेटणं-बोलणं त्यांनी सोडून दिलंय.

Dilip Kumar and Saira Banu pose together at home.
LockUpp- 'मंदानाचं खरं रुप कळलं तर हैराण व्हाल'; अखेर दीरानं केली पोलखोल

दिलीप कुमार यांचं निधन गेल्या वर्षी ७ जुलैला वयात्या ९८ व्या वर्षी झालं. खूप दिवस वृद्धापकाळानं आजारी पडल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनादिवशी अंत्यदर्शनासाठी धर्मेंद्र,शाहरुख खान(Shaharukh Khan),अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) अशा अनेक बॉलीवूड स्टार्सनी त्यांच्या घरी उपस्थिती दर्शवली होती. त्यादिवशी सायरा बानो यांना सर्वांनीच खूप भावूक झालेलं पाहिलं. त्या शेवटपर्यंत दिलीप कुमार यांच्या माथ्याजवळ बसून होत्या. खूप रडतानाही दिसल्या. त्या दिवशी त्या सगळ्यांना भेटल्या एवढंच. पण त्यानंतर घराबाहेरच्या कोणालाच त्या दिसल्या नाहीत ना कुणी त्यांना घराबाहेर पडताना फारसं पाहिलंय.

Dilip Kumar and Saira Banu pose together at home.
आलिया-रणबीर लग्नाची 'Date, Venue' सगळंच बदललं!; काय म्हणाला राहुल भट्ट?

एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीत सायरा म्हणाल्या, ''मी पूर्णपणे कोसळलेय. मला दिलीप जाण्याचा खूप त्रास होतोय. मी या दुःखातून कशी बाहेर येऊ? हे माझ्यानं शक्यच नाही. मी दिलीपचं सगळं अगदी शेवटपर्यंत खूप आनंदानं केलं. मी खूश होते, तो वयामुळे नुसता निजून असला तरी. आम्ही दोघंच आणि आमच्या दोघांचं जग. मला साहेब सोबत बसायला खूप आवडायचं. मला बाहेर जाणं,मिरवणं, पार्टीत जाणं फारसं आवडत नाही. हल्ली तर मी थोडं देखील बाहेर पडणं सोडून दिलंय. मला माहित नाही,मी या दुःखातून कधी सावरू शकेन. पण तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही. आणि ती वेळ कधी येईल हे मी सांगू शकत नाही. मला साहेब माझ्या आयुष्यात हवाय''.

Dilip Kumar and Saira Banu pose together at home.
आली समीप लग्नघटिका; नीतू कपूर यांनी खास फोटो शेअर करीत जागवल्या आठवणी

सायरा बानो पुढे आपल्या मुलाखतीत म्हणाल्या,''मला फारसं लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. मी फक्त माझ्या काही जवळच्या मित्रपरिवारालाच कधीतरी भेटते. खरंतर मी भाग्यवान आहे की माझ्या अवतीभवती विचारपूस करणारी लोकं आहेत. आता मी खूप योगा करते,ध्यानसाधना करते,प्रार्थना करते. मला माहितीय दुःखाचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येत असतील. पण माझं साहेबशी वेगळंच बॉन्ड होतं. जे मी कधीच विसरु शकत नाही''. काही दिवसांपूर्वी सायरा बानो मुंबईतील इस्पितळात उच्च रक्दाबाच्या आजारामुळे दाखल झाल्या होत्या. त्यांना श्वसनाचा देखील त्रास होत होता. आयसीयू मध्ये काही दिवस त्यांना ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओग्राफी करावी लागेल असं सूचित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.