माझ्यावर खोटा आरोप, रिक्षाचालकाने सैराट फेम अरबाज शेखला स्पष्टच सांगितले

रिक्षाचालकाचे सैराट फेम अरबाज शेखला स्पष्टच सांगितले
sairat  fame actor arbaz shaikh
sairat fame actor arbaz shaikh sakal
Updated on

सैराट (Sairat) हा नागराज मंजुळे यांचा मराठीत गाजलेला चित्रपट. यात मुख्य भूमिकेत अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु हे होते. यात सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेख (Arbaz Shaikh) हा सहकलाकार होता. सध्या अरबाज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच पुण्यातील (Pune) एका रिक्षाचालकाकडून झालेल्या मनस्तापाविषयी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टबरोबर अरबाजने रिक्षाचा पाठमोरा फोटो आणि नंबर शेअर केला होता. तसेच रिक्षाचालकाने शिवीगाळ केल्याचा आरोप त्याने केला होता. (Sairat Fame Salya Arbaz Shaikh And Auto Rishaw Driver Controversy)

sairat  fame actor arbaz shaikh
Timepass 3 : वातावरणातला गारवा वाढवणारं टाईमपास ३ चं 'कोल्ड ड्रिंक' सॉंग..

यावर रिक्षाचालक आसिफ मुल्ला अरबाज याने आपली बाजू मांडली आहे. माध्यमांशी बोलताना रिक्षाचालक म्हणाला, अरबाजच्या पोस्टमुळे मला बाहेर पडण कठीण झाले आहे. अरबाजने धायरी फाट्याजवळ रिक्षा बुक केली. तेथून त्याला पुणे रेल्वे स्टेशनवरुन रेल्वे पकडायची होती. मी गुगल मॅपची मदत घेत रिक्षा भिडे पुलाजवळ नेली. पण पुलावर नदीचे पाणी वाढल्याने पोलिसांनी तो रस्ता बंद केला होता. अरबाजची सहाची ट्रेन होती, असे त्याने मला सांगितले. त्यामुळे भिडे पुलावरुन रिक्षा घेतली.

sairat  fame actor arbaz shaikh
अरबाज, अर्जुननंतर आता मलायका 'या' Chocolate Boy च्या प्रेमात

नदीतील पाणी वाढल्यामुळे रिक्षा पुढे कशी जाणार? यावरुन तुम्ही येथून जाऊ शकता एवढ मी त्याला म्हटलं. नंतर अरबाजला अप्पा बळवंत चौकमार्गे कुंभारवाड्यातून स्टेशनला सोडले आणि पैसे देऊन तो निघून गेला, असे रिक्षाचालकाने सांगितले. त्यांना शिवी वगैरे काहीच दिली नाही. माझ्यावर खोटा आरोप लावल्याचे रिक्षाचालक म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()