Saisha Bhoir mother's problems news: रंग माझा वेगळा, नवा गडी नवं राज्य अशा अनेक मालिकांमध्ये झळकलेली लोकप्रिय बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या अडचणीत वाढ झालीय.
साईशाची आई पूजा यांनी काही दिवसांपूर्वी एका जोडप्याला १६ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती.
आता साईशाच्या आईने आणखी एका व्यक्तीला फसवलं आहे. पंकज जाधव या २५ वर्षीय व्यक्तीने साईशाच्या आईवर पैशांच्या फसवणुकीचे आरोप केलेत.
(Saisha Bhoir'Child artists mother's problems police custody increased due to another fraud)
काय आहे प्रकरण?
पंकजला इंस्टाग्रामवर व्हिडिओज पाहायला फार आवडायचे. याच माध्यमातून त्याची साईशाची आई पूजा यांच्याशी ओळख झाली. पूजा यांनी ओळखीचा फायदा घेत पंकजला लाखो पैशांचं आमिष दाखवून एक स्कीम सांगितली.
या स्कीममध्ये पंकजला एक लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. गुंतवलेल्या रकमेवर पंकजला महिन्याला ७ हजार रुपये एवढे व्याज मिळू लागले.
बघता बघता त्याला दहा महिन्यांमध्ये ७० हजारांचा फायदा झाला. नफा झाल्याचे पाहून पंकजला पूजा यांच्या स्कीमवर विश्वास बसू लागला.
झटपट श्रीमंती अंगाशी आली
पंकजवर विश्वास बघतोय असं बघत पूजा यांनी त्याला एक लाख रुपयांची स्कीम बंद झाल्याची सांगून आता दहा लाख रुपयांची स्कीम सुरू आहे असे सांगितले. ठेवलेल्या विश्वासामुळे पंकजने डोळे झाकून दहा लाख रुपये गुंतवले.
बरेच दिवस होऊन गेले पण व्याज काही मिळत नव्हतं. हे लक्षात येताच पंकजने पूजा यांच्याशी संपर्क साधला. परंतु पूजा काही ना काही कारण काढून पंकजला टाळत होती. शेवटी पंकजने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे पूजा यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतंय.
साईशाच्या आईला अटक झाल्यामुळे साईशाच्या मालिकेतील करियरवर परिणाम होणार का अशी शक्य वर्तवली जात आहे. लहान वयात साईशासाठी आईला अटक होणं ही फार मोठी घटना आहे.
साईशा सध्या नवा गडी नवं राज्य मालिकेत अभिनय करतेय. साईशाच्या कामावर या गोष्टीचा कोणताही परिणाम होणार नाही.
सेटवर तिच्याशी याबाबत बोलणे टाळलं जात आहे. तिच्या शुटिंगवर या घटनेचा कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.