Sakal Mahabrands 2023 Sonali Kulkarni marathi actress : मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत येते. केवळ महाराष्ट्रच नाहीतर देश- विदेशात सोनालीच्या अभिनयाचे चाहते आहे. सोनाली ही तिच्या परखड वक्तव्यासाठी देखील ओळखले जाते. आता ती तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
सकाळ माध्यम समुहाच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या 'ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र' या पुरस्कार सोहळ्यात सोनाली बोलत होती. यावेळी तिनं व्यक्त केलेल्या भावनांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सोनालीनं तिचा सकाळ वृत्तपत्रासोबतचा प्रवास,त्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
सोनाली कुलकर्णी म्हणाली की, मला अजूनही आहो जाहो म्हटल्यावर प्रचंड अवघडल्यासारखं होतं. नेता जरी नसले तरी अभिनेत्री आहे. त्यामुळे माईक समोर आल्यावर बोलावसं वाटतं. मी खूप साध्या घरातून आली आहे. साध्या परिस्थितीतून वेगळी वाट तयार केली आहे. माझा हक्काचा पॉकेटमनी मला बालकल्याणनं दिला आहे. चार ते पाच वर्षे मी काम केले होते. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत सोळा वर्षे काम केले. हे संदर्भ तुमच्या करिअरला महत्वाचे वळण देतात. असे मला वाटते.
जोपर्यत सकाळमध्ये बातमी येत नाही तो पर्यत आपण काही साध्य केले असे वाटत नाही. सकाळकडून जे कौतूक होते त्याचे ऋण व्यक्त करता येत नाही. मुंबईमध्ये छोट्या घरात राहत होते. त्यावेळी माझ्याकडे पेजर होता. एका दुसऱ्या घरात फोन होता. त्यावर फोन आला होता. त्यावरुन खूप कौतूक ऐकू येत होते. तो खूपच स्निग्ध आवाज होता. तो आवाज सुलोचना ताईंचा होता. त्यांनी खूप मेहनतीनं माझा नंबर मिळवला. याचा आणि सकाळचा मोठा संबंध आहे. अशा शब्दांत सोनालीनं सकाळ वृत्तपत्र समुहाविषयी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
तुम्ही महाब्रँड होण्याअगोदर तुमच्या पाठीवर कुणी ठेवणारं लागतं. माझ्या पाठीवर तो हात सुलोचना ताईंचा होता. माझे प्रत्येक काम सुलोचना ताई बघणार आहे. अशी भावना माझ्या मनात कायम होती. तसेच सकाळचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम आहे. मी माझ्या नाटकाची जाहिरात द्यायला सायकलवर जायचे. ते दिवस अजूनही मला आठवतात. तुम्ही माझ्या जाहिरातीचे पैसे कमी कराल का अशी विनवणी देखील मी करायची.
आपल्या प्रत्येकाच्या मागे अनेकांची मेहनत असते. टीमवर्कमुळे अनेक गोष्टी साध्य होते. मी एक छोटीशी इंडस्ट्रीलियस्ट देखील आहे. आमच्याही क्षेत्रात खूप राजकारण आहे. ती कधी कधी वैयक्तिक असते. तर कधी खूप मोठे असते. पण तुम्हाला मोठे व्हायचे तर तो संघर्ष असतो. ते सुद्धा आम्ही सांभाळतो. यासगळ्यात आम्ही आपल्या स्वप्नांना गवसणी घालतो. अशा शब्दांत सोनालीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.