Salaar Advance Booking : राजामौली यांनी खरेदी केलं 'सालार'चं पहिलं तिकीट, अ‍ॅडव्हान्स बुकींगमध्ये मारली बाजी!

प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या सालार या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते.
Salaar Advance Booking
Salaar Advance Bookingesakal
Updated on

Salaar Advance Booking - प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या सालार या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होतो आहे. त्याच्या अॅडव्हान्स बुकींगला जोरदार सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. प्रख्यात दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी सालार च्या पहिल्या शो चे तिकीट खरेदी केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रभासचा या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून सालार पार्ट १ सीझफायरकडे पाहिले जात आहे. यापूर्वी त्यानं दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषमध्ये काम केले होते. त्यात त्यानं प्रभु श्रीराम यांची साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन गेली. मात्र या चित्रपटावर वेगवेगळ्या कारणांमुळे वादही झाला होता.

२२ डिसेंबर रोजी सालार हा देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी मेकर्सनं अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर प्रभासच्या सालारचा ट्रेलर हा प्रेक्षकांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. या चित्रपटासाठी हॉलीवूडमधील तंत्रज्ञ, फाईट मास्टर, अॅक्शन डिरेक्टर यांची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे.

आतापर्यत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सालारनं अॅडव्हान्स बुकींगमध्ये मोठी कमाई केली आहे. सालारच्या जोडीला किंग खान शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्याचीही तुफान चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या डंकीचा ट्रेलर आणि गाणी ही सोशल मीडियावर चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सालारचे दिग्दर्शन केले आहे. बाहुबली आणि आरआरआर चे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी सालारच्या पहिल्या शो चे तिकीट अॅडव्हान्समध्ये घेतले आहे. ती पोस्ट मेकर्सनं सोशल मीडियावर शेयर केली असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

सालारच्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाल्यास त्यात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅकनिल्कच्या एका रिपोर्टनुसार, आतापर्यत सालारचे २२ हजार ११७ तिकीट अॅडव्हान्स बुक झाले आहे. त्यातून त्यानं प्रदर्शनापूर्वीच ४९ लाख ३५ हजारांची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात तेलुगू भाषेत सर्वाधिक तिकीटांची बुकींग झाली आहे.

Salaar Advance Booking
Animal Worldwide Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चा कहर, ८०० कोटींच्या जवळ गेला! बॉबीच्या करिअरमधला सर्वात हिट चित्रपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.