Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

ज्येष्ठ लेखक सलमान खानचे वडील सलीम खान यांची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटा प्रमाणेच रंजक आहे.
Salim Khan Birthday salman khan father writer salim khan and helen love story
Salim Khan Birthday salman khan father writer salim khan and helen love story Esakal
Updated on

Salim Khan: बॉलिवूडमधील ज्येष्ठ लेखक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते आणि भाईजान सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांचा आज वाढदविस आहे. ज्याप्रमाणे त्यांची लेखणी रंजक काही लिहीत असते तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. पत्नी, चार मुलं असतानाही सलीम खान हेलन यांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी सगळ्यांच्या विरोध पत्करून लग्नही केलं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया यांची लव्हस्टोरी..

(Salim Khan Birthday salman khan father writer salim khan and helen love story)

Salim Khan Birthday salman khan father writer salim khan and helen love story
Vikram Gokhale: प्रकृतीबाबत कुटुंबीयांचं स्पष्टीकरण, अजय देवगणने केलं होतं ट्विट

सलीम यांच्या लेखणीतून आलेल्या चित्रपटाने बॉलीवुडमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांना त्यांची ओळख मिळवून देणारे ठरले. त्यामुळे सलीम खान यांच्या लेखनीला बॉलीवुडमध्ये विशेष महत्व आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हते. पहिली पत्नी, चार मुलं आणि कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी हेलेन यांच्याशी लग्न केलं, त्याचीच ही स्टोरी..

Salim Khan Birthday salman khan father writer salim khan and helen love story
Amruta Khanvilkar Birthday: 'वाजले की बारा'नं अमृताचं नशीबच पालटलं.. कसं ते वाचा..

अनेक हिट चित्रपटांचे लेखन करणारे सलीम खान हेलन यांच्या प्रेमात अक्षरशः वेडे झाले होते. हेलन यांनी अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात करूनही त्यांना मनासारखे यश मिळत नव्हती. याच दरम्यान हेलन यांची भेट tyavत्यावेळचे प्रसिद्ध चित्रपट लेखक आणि निर्माते सलीम खान यांच्याशी झाली. पुढे मैत्री आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं. पण ही प्रेम अनेकांना आवडलं नाही. सलीम यांचे लग्न झालेले असून त्यांना चार मुलं असल्याने हेलन यांच्याशी असलेलं प्रेम अनेकांना मान्य नव्हतं.

सलीम यांनी 1964 मध्ये  सुशीला चारक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.  सुशीला आणि सलीम यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. असे असतानाही ते हेलन यांच्या प्रेमात पडले. कुटुंबातून त्यांना बराच विरोध झाला पण तो झुगारून 1981 मध्ये सलीम यांनी हेलन यांच्याशी लग्न केले.

सलीम यांनी 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बारात’या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यानंतर 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरहदी लुटेरा, तीसरी मंजिल आणि 1967 मध्ये रिलीज झालेल्या दीवाना चित्रपटात त्यांनी काम केलं. 1975 शोले या सुपरहिट चित्रपटाचे संवाद लेखन सलीम यांनी केले. तसेच  डॉन, दिल तेरा दीवाना,काला पत्थरशान, शान, दीवार या चित्रपटांचे लेखन देखील त्यांनी केले. इंसानियत के देवता, बिल्ला नम्बर 786 या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.