'दक्षिणेत तुमचे सिनेमे चालवायचेत तर आधी...'; KGF स्टार यशचा सलमानला सल्ला

RRR सिनेमाची प्रशंसा करताना सलमान खान एका कार्यक्रमात दक्षिणेत बॉलीवूडचे सिनेमे चालत नाहीत असं म्हणाला होता.
Salman Khan $ KGF Chapter 2 Fame Yash.
Salman Khan $ KGF Chapter 2 Fame Yash.Google
Updated on

गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्सऑफिस(Boxoffice)वर बॉलीवूडच्या(Bollywood) सिनेमांना चांगलीच टक्क दिलेली आपण पाहिली असेल. 'बाहुबली'पासून हा सिलसिला खरंतर सुरू झाला,तो अजूनही कायम आहे. 'पुष्पा-द राइज',आता 'KGF Chapter 2' या सिनेमांना देशभरात चांगला पाठिंबा मिळाला आणि मिळत आहे. KGF Chapter 2 तर अजून प्रदर्शितही झालेला नाही आणि सिनेमानं अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून 25 करोड रुपये कमावले देखील. तर RRR हा सिनेमा जगभरातनं 1000 करोडपेक्षा अधिक कमाई करुन बसला आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान सलमान खाननं(Salman Khan) RRR ची प्रशंसा केली होती,आणि त्याचवेळी त्यानं बॉलीवूड सिनेमे दक्षिणेत चालत नाहीत याविषयी चिंताही व्यक्त केली होती. सलमानच्या त्या वक्तव्यावर आता KGF फेम यश(Yash) नं उत्तर दिलं आहे.

Salman Khan $ KGF Chapter 2 Fame Yash.
आलिया-रणबीरचं लग्न Postponed! भट्ट कुटुंबाची मीडियाला मोठी माहिती

सलमान खानने दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणच्या जन्मदिनी त्याला शुभेच्छा देताना,त्याच्या RRR सिनेमाचं तोंडभरून कौतूक केलं होतं. तो म्हणाला होता,''RRR मध्ये रामचरणने सुंदर काम केलं आहे. मी त्याला वाढदिवशी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याच्या सिनेमाच्या यशासाठी देखील त्याचं अभिनंदन केलं होतं. खुप छान वाटतं की तो खुप चांगलं काम करतोय आणि करिअरमध्ये पुढे जातोय. पण मला या गोष्टीचं अजुनही खुप आश्चर्य वाटतं आणि चिंताही सतावते की आमचे बॉलीवूड सिनेमा दक्षिणेत चांगली कमाई का करु शकत नाहीत. पण दाक्षिणात्य सिनेमे आपल्याकडे चांगली कमाई करीत आहेत.

Salman Khan $ KGF Chapter 2 Fame Yash.
मुलांना जन्म देण्याविषयी संजयचा रणबीरला खास सल्ला; संसाराचा कानमंत्रही दिला

आता यावर KGF Chapter 2 चा लीड अभिनेता आणि दक्षिणेकडचा सुपरस्टार यशनं एका कार्यक्रमात सलमानच्या त्या वक्तव्याला चोख उत्तर दिलं आहे. यश म्हणाला आहे,''असं काही नसतं. पहिल्यांदा आमचे सिनेमे देखील बॉलीवूड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायचे नाहीत. पहिल्यांदा जसं डबिंग व्हायचं त्यात आणि आतामध्ये खूप फरक आहे. खूप प्रगती झालीय. आता लोकांना दक्षिणेकडच्या सिनेमाचा कंटेट आवडतोय. पहिल्यांदा केवळ मनोरंजन म्हणून आमचे सिनेमे पाहिले जायचे. काही लोक तर आमच्या सिनेमांची खिल्लीही उडवायचे. हसायचे आमच्या सिनेमांवर. तेव्हा ज्या पद्धतीचं डबिंग व्हायचं त्याचा दर्जा चांगला नसायचा. कदाचित त्यामुळे सिनेमे चालायचे नाहीत. त्यावेळी दक्षिणेकडच्या सिनेमांना कमी लेखलं जायचं,जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं. पण आता हळूहळू आमची कथा सांगण्याची पद्धत लोकांना आवडत आहे. मला नाही वाटत की हे एका रात्रीत झालं असेल. हळूहळू लोकांनी आमच्या सिनेमातील कंटेटला समजून घेतलं. आमच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीला ते समजू लागले. खऱ्या अर्थानं बाहुबली सिनेमानंतर दाक्षिणात्य सिनेमांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. राजामौली सारखा दिग्दर्शक आणि प्रभास सारख्या अभिनेत्यामुळे दाक्षिणात्य सिनेमालाही लोक महत्तव देऊ लागले. KGF हा आमचा सिनेमाही यात योगदान नक्कीच देईल. आता व्यावसायिक पातळीवर आमच्या सिनेमांना मोठं यश मिळत आहे आणि ते उल्लेखनीय आहे'' असं यश म्हणाला.

Salman Khan $ KGF Chapter 2 Fame Yash.
'द काश्मिर फाईल्स' पाहणं सोनू निगम टाळतोय; कारणं सांगत केला मोठा खुलासा

यश पुढे म्हणाला,''आपल्या संस्कृतीत खूप विविधता आहे. आपण या संस्कृतीला आपलं बलंस्थान बनवलं पाहिजे,ना की कमजोरी. नॉर्थचे कितीतरी सिनेमा साऊथमध्ये चांगले चाललेयत. काही हिंदी स्टार्सची क्रेझही दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये आहे. काही बॉलीवूड स्टार्सच्या सिनेमांना पाहण्यासाठी दक्षिणेत तोबा गर्दी करतात प्रेक्षक. पण सलमान खान म्हणाला ते सुद्धा नाकारु शकत नाही. अगदीच आम्ही पाहत नाही असं होत नाही. सिनेमे प्रदर्शित करण्याआधी इतरही अनेक गोष्टी असतात ज्या विचारात घेऊन त्या पद्धतीनं सिनेमा प्रदर्शित केला पाहिजे. ड्रस्ट्रिब्युशन हे त्यात खूप महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की सगळे एकत्रितपणे असं काम करतील की यापुढे दक्षिणेकडचा सिनेमा -बॉलीवूडचा सिनेमा असं काही नसेल,सिनेमा हा फक्त सिनेमा असेल आणि सगळ्यांनाचा सगळीकडे चांगलं यश मिळेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.