"यात माझा धर्म मध्ये का आणताय?"; सलमानचा शेजाऱ्याला सवाल

सलमान खानने त्याच्या पनवेल फार्महाऊसच्या शेजाऱ्याविरोधात दाखल केला मानहानीचा दावा
Salman Khan
Salman Khanfile
Updated on

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसच्या शेजाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीत सलमानने त्याच्या वकिलामार्फत शेजाऱ्यावर आपली धार्मिक ओळख विनाकारण वादात ओढल्याचा आरोप केला. सलमानने त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसचा शेजारी केतन कक्कड (Ketan Kakkad) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. केतन यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानची बदनामी केल्याचा आरोप या खटल्यात केला आहे.

'लाइव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी न्यायालयासमोर केतन कक्कड यांच्या पोस्ट आणि मुलाखतींमधील महत्त्वपूर्ण भाग वाचून दाखवले. यात केतन यांनी सलमानवर 'डी गँग'मध्ये सामील असल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे त्याच्या धर्मावरही भाष्य केलं होतं. इतकंच नव्हे तर राजकीय पक्षांशी संबंध ठेवणे, मुलांची तस्करी केल्याचा आणि फार्महाऊसमध्ये मृतदेह दफन केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी लावला आहे.

या आरोपांवर सलमानने त्याच्या वकिलामार्फत उत्तर देताना म्हटलं की, "योग्य पुराव्याशिवाय हे सर्व आरोप म्हणजे केवळ कल्पना आहेत. एका मालमत्तेच्या वादात तुम्ही माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का देत आहात. या वादात धर्म आणण्याचं काय कारण आहे? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आहेत आणि माझ्या भावांनी हिंदूंशी लग्न केलं, आम्ही सर्व सण साजरे करतो."

Salman Khan
'पुष्पा'वर बंदी घाला; गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

"तुम्ही सुशिक्षित व्यक्ती आहात. असे आरोप करण्यासाठी तुम्ही गुंड नाही. आजकाल सर्वात सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर काही फॉलोअर्स गोळा करून तुमचा सर्व राग काढणे. माझा राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही", असं सलमानने वकिलामार्फत स्पष्ट केलं.

कक्कड यांनी यूट्यूबरला मुलाखत देताना त्याची बदनामी केली असा आरोप सलमानने केला आहे. या शोचा भाग असलेल्या इतर दोन लोकांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय गुगल, युट्युब, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांचाही त्यात उल्लेख आहे. या कंपन्यांनी त्यांच्या साइटवरून सलमानविरुद्ध बदनामीकारक मजकूर काढून टाकावा अशी मागणी खटल्यातून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.