बॉलिवूडचा दबंग सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या नंतर. त्याला मुंबई पोलिसांकडून आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. आशीच एक घटना 2013 ला हैद्रारबादमध्ये सलमान खानसोबत घडली होती. सालमानच्या गाडी मागे 20 दुचाकीस्वार हातात रॉड आणि काठ्या घेवून पाठलाग करत होते. जेव्हा सलमान खान सेलिब्रिटी क्रिकेट लीगसाठी हैदराबादला गेला होता.
या क्रिकेट लीगमध्ये सलमान खानचा भाऊ, सोहेल खान मुंबई हिरोजकडून खेळत होता. सोहेलचा संघ तेलुगू वॉरियर्स विरुद्ध खेळत होता. हा सामना लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर सुरू होता. रात्री 11 वाजता सामना संपला, सामना संपल्यानंतर सलमान खान स्टेडियम सोडून पार्किंगच्या दिशेने गेला.
सुरक्षेच्यासाठी सलमान ज्या गेट मधून जाणार आहे. तेथून लोकांना बाहेर काढले होते. सलमानची कार स्टेडियमच्या बाहेर येताच 20 दुचाकीस्वारांनी सलमानच्या कारचा पाठलाग सुरू केला. त्या सर्व लोकांच्या हातात रॉड होते. पुढे काही अंतरावर गेल्यावर सलमानच्या कारचा दरवारजा बाइकस्वारांनी ठोठवला.
या बाइकस्वारांनी स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत सलमानच्या कारचा पाठलाग केला.या घटनेमुळे सलमान चांगलाच संतापला. दुचाकीस्वारांच्या या वागण्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. आता त्या बाईकस्वारांना सलमानचे फॅन्स म्हणता येणार नाही ज्यांनी असे भयानक कृत्य त्यांनी केले. सलमान खानचा पारा चढवणारे त्याचे चाहते अजिबात असू शकत नाहीत.
काही अभिनेत्यांना आयुष्यात अशा धोकादायक अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. सलमान खानच्या बद्दल बोलायचे झाले तर त्याचा आगामी चित्रपट भाईजान आहे. त्याच्या सोबत मुख्य भुमिकेत पूजा हेगडे दिसणार आहे. या चित्रपटातून शहनाज गिलही पदार्पण करत आहे. सलमान खानचा हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सलमानचा टायगर 3 देखील सध्या चर्चेत आहे. सलमान खानच्या या आगामी चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.