Salman Khan News: गेल्या काही महिन्यांपासून गोल्डी ब्रारने सलमानला खुल्लेआम संपवण्याची धमकी दिलीय. या दोघांमधला संघर्ष टोकाला गेलाय. याआधी बिष्णोई गॅंगने सुद्धा काळवीट प्रकरणामुळे सलमानला संपवण्याची घोषणा होती.
आता पुन्हा एकदा सलमानला संपवण्याची घोषणा आलीय. त्यामुळे सलमानच्या फॅन्सना आता भाईजानची काळजी वाटू लागली आहे.
(salman khan death threat by Goldy Brar Will definitely kill Salman Khan after Sidhu Moosewala )
सलमान खानला अनेकदा जाहीरपणे धमक्या देणाऱ्या आणि टीव्ही चॅनलवर खुली मुलाखत देणाऱ्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाचा खून केल्याची कबुली दिली आहे. आणि आता सलमान खान त्याचे लक्ष्य आहे.
गोल्डी ब्रारने पुन्हा एकदा एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो सलमान खानलाही वेळ मिळेल तेव्हा मारेल. कॅनडाच्या पोलिसांनी गोल्डी ब्रारवर बक्षीस ठेवले आहे आणि इंटरपोल पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
गोल्डी ब्रार मुलाखतीत म्हणाला, “आम्ही त्याला ठार मारू, नक्कीच मारू. त्यांनी बिष्णोई समाजाचा अनादर केला आहे. काळवीटाची शिकार केली. ज्याला बिश्नोई समाज पवित्र मानतो, जसे हिंदू देवता आणि शीख गुरू ग्रंथ साहिब मानतात.
ब्रार पुढे म्हणतो.. "आम्ही सलमानला माफी मागायला सांगितली. पण भाई साहेबांनी माफी मागितली नाही. वेळ आली कि आम्ही त्याचा अहंकार तोडू.
आम्ही आधीही म्हणतोय की हे फक्त सलमान खानसाठी मर्यादित नाही, जोपर्यंत आमचे शत्रू आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना जिवंत सोडणार नाहीय. आम्ही प्रयत्न करत राहू. नाहीतर आमच्या नंतर आमच्या गॅंगमधली इतर माणसं त्यांना सोडणार नाहीत."
या वर्षाच्या सुरुवातीला 18 मार्च रोजी सलमानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला धमकीचा ईमेल आला होता. यानंतर प्रशांत वांद्रे पोलिसात पोहोचला. तेथे त्यांनी तक्रार करून FIR दाखल केला.
ईमेल पाठवणाऱ्याचे नाव रोहित गर्ग असल्याचे सांगण्यात आले. प्रशांतच्या म्हणण्यानुसार, त्याने ईमेलमध्ये लिहिले,
“गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना तुमच्या बॉस सलमानशी बोलायचे आहे. त्याने (लॉरेन्स बिश्नोईची) मुलाखत पाहिली असेल. बघितला नसेल तर बघायला सांगा. प्रकरण बंद करायचे असेल तर करा, समोरासमोर करायचे असेल तर सांग. तुम्हाला वेळेत कळवले आहे. पुढच्या वेळी बोलणं नाही तर फक्त धक्काच दिसेल".
त्याचवेळी लॉरेन्स बिश्नोई यांनी तुरुंगातून एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने अनेक खुलासे केले होते.
सलमान खानला धडा शिकवण्याचा आपला हेतू असल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. यानंतर सलमान खानला Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. आता या धमकीचं रूपांतर कशात होणार हे पाहावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.