सलमान खानचा(Salman Khan) पनवेल फॉर्महाऊसच्या(Panvel farmhouse) NRI शेजाऱ्यासोबत चाललेला वाद अभिनेत्याला भारी पडण्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणात सुरु असलेल्या केसमुळे(Defamation Case) आता सलमानच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या सिव्हिल कोर्टाने हे मान्य केलं आहे की केतनं कक्कडने जमिनीसंदर्भात सलमानवर जे आरोप केले होते,ते खरे होते. त्याचा कुठलाही आरोप खोटा नाही. त्यामुळे कोर्टानं सलमाननं शेजाऱ्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्याला रद्दबातल केलंय. सलमाननं दावा केला होता की ,हे आरोप त्याची फक्त बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. कोर्टाने केतनने जे पुरावे सादर केले होते त्यांच्या आधारावर सलमानचं म्हणणं खोटं होतं असं मान्य केलं आहे. सलमानचा शेजारी तक्रारदार केतननं अभिनेत्याविरोधात जमिनीसंदर्भातले पुरावे सादर करताना म्हटलं होतं की,त्याला जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली आहे. मुंबई सेशन कोर्टाचे न्यायाधीश AH लद्दाद म्हणाले की,''सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. ती जमिन सलमाननचीच आहे हे त्याला पूर्ण सिद्ध करता आलं नाही. कक्कडने मात्र जे पुरावे सादर केले ते त्याच्या म्हणण्याला खरं ठरवत आहेत. त्याचसोबत सलमाननं त्याचा शेजारी केतन कक्क्ड विरोधात कोर्टाकडे 'न्यायालयीन मनाई हुकूम'साठी(Injunction Application) परवानगी मागितली होती त्यालादेखील कोर्टानं रद्द केलं आहे.
केतन कक्कडकडे नेमके कोणते पुरावे आहेत?
कोर्टानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की सलमाननं ज्या जमिनीवर NRI शेजारी कक्कडला येण्यासाठी मनाई केली होती,त्या जमिनी संदर्भातले महत्त्वाचे पुरावे केतन कक्कडने सादर केलेयत. कोर्टानं या पुराव्यांना ग्राह्य धरत सलमान या केससंदर्भात जी आपली बाजू मांडत आहे त्यात काहीही तथ्य नाही. सलमान खाननं केतननं लावलेल्या आरोपात सत्यता नाही हा मुद्दा मांडताना एक विनंती केली होती की या केससंदर्भातील अंतिम निर्णय होईपर्यंत कक्कड आणि या केसशी संबंधित अन्य लोकांविरोधात एक आदेश जारी करावा की त्यांनी कोणतीही अपमानजनक पोस्ट किंवा भाष्य कुठेही करू नये. त्याच्याविरोधात केले गेलेले आरोप खोटे आहेत,आणि मुद्दामहून केले जातायत. सलमानला बदनाम करण्याचा यामागे हेतू आहे.
केतन कक्कडच्या वकिलांचे याबाबतीत म्हणणं आहे की,सलमाननं आपल्या फार्महाऊसभोवती जो लोखंडाचा मजबूत गेट करुन घेतलाय तो केतनच्या जमिनीवर आहे. त्यामुळे केतनला आपल्या जमिनीचा पूर्ण वापर करता येत नाही. त्या जमिनीवर केतनचं मंदिर आहे,पण सलमाननं त्या जमिनीवर येण्यास मनाई केल्यानं ते साधं देवदर्शनही करू शकत नाहीत. एवढंच नाही तर कक्कड यांना इलेक्ट्रिसिटीचीही अडचण सलमानतर्फे निर्माण करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार दाखल केली असून त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी चौकशी केली जात आहे. यासंदर्भातल्या छोट्या-छोट्या अनेक केसेस संबंधित कोर्टात सुरु असल्याचं केतन कक्कडच्या वकिलांनी म्हटलं आहे. सलमानच्यामागे केसेसचा ससेमिरा सुरुच आहे. एकातनं सुटतोय तर दुसरी केस डोकं वर काढतेय. आता पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी त्याला ५ एप्रिलला अंधेरी कोर्टात हजर राहण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते. ते पूर्ण होत नाहीय तर आता शेजाऱ्याविरोधातल्या केसमध्येही त्याला हार पत्करावी लागतेय असं चित्र निर्माण झालं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.