Salman Khan News: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आलाय. लॉरेन्स बिश्नोईनं आपल्या मुलाखतीत सर्वांसमोर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देऊन एकच खळबळ उडवून दिली.
त्यानंतर सलमानला धमकी देणारा ईमेलही आला. त्यामुळे आता या सगळ्या घटनांमुळे सलमानच्या घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
(salman khan Don't beg for such threats.. The family friend revealed)
अशातच सलमान खानच्या फॅमिली फ्रेंडने एक खुलासा केलाय. सलमानचे निकटवर्तीय असलेल्या एका फॅमिली फ्रेंडने खुलासा केला कि..“सलमान या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही..
किंवा कदाचित तो चेहऱ्यावर काही दाखवत नाही जेणेकरून त्याच्या आई बाबांना काळजी वाटू नये. हे कुटुंब कायमच हम साथ साथ असते.
त्यामुळे बाहेरून सलीम साब खूप शांत आणि मस्त राहतात. परंतु संपूर्ण कुटुंबाला माहित आहे की सलीम साबना या या धमक्यांमुळे रात्रीची झोप लागत नाही”
याशिवाय हा मित्र पुढे म्हणाला, “सलमानला वाटते की तो धमकीकडे जितके जास्त लक्ष देईल तितके धमकी देणाऱ्याला वाटेल कि तो त्याला हवे ते करण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे जे व्हायचे आहे ते घडेल तेव्हा होईल.
तथापि कौटुंबिक दबावामुळे सलमानने किसी का भाई किसी कि जान रिलीजच्या पोस्ट-प्रॉडक्शन कार्याशिवाय बाहेर जाणं कमी केले आहे.” असा खुलासा या मित्राने केला.
या सर्व काळात सलमानची काळवीट शिकार केस पुन्हा चर्चेत आली आहे. हे प्रकरण १९९८ सालचं आहे. लॉरेन्स बिश्नोई तेव्हा साधारण ४ ते ५ वर्षांचा होता.
त्याने मुलाखतीत सांगितलं की सलमानविषयीचा त्याच्या मनातील राग हा तेव्हापासून आहे. त्याने या मुलाखतीत धक्कादायक विधानं देखील केली आहेत..जी खूपच श़ॉकिंग आहेत.
एबीपी ला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बोलला की कोणत्याची जीवाची हत्या करणं आमच्यासाठी पाप आहे. आम्ही झाडांना देखील पाडत नाही. आणि सलमाननं आमच्या प्रदेशात येऊन एका जीवाची हत्या केली. २०-२५ वर्ष ही केस चालू आहे.
सलमाननं बिश्नोई समाजाचा अवमान केला आणि एकदा देखील माफी मागितली नाही. आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.