Salim Khan : '....म्हणून सलमानसाठी मी कधीही स्क्रिप्ट लिहिली नाही', वडील सलीम खान यांनी काय सांगितलं कारण?

शोले, दीवार, त्रिशुल, यादो की बारात सारख्या चित्रपटांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सलीम खान यांची गोष्टच वेगळी आहे.
Salman Khan Father Salim Khan Explained
Salman Khan Father Salim Khan Explained esakal
Updated on

Salman Khan Father Salim Khan Explained : बॉलीवूडमध्ये प्रख्यात स्क्रिप्टरायटर म्हणून ज्यांचे नाव नेहमीच घेतले जाते त्या सलीम खान यांची लोकप्रियता मोठी आहे. सलीम-जावेद या जोडगोळीनं बॉलीवूडवर दोन दशकांहून अधिक काळ अधिराज्य केले. त्यांनी बॉलीवूडला कित्येक सुपरस्टार दिले. त्यात अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव सांगता येईल.

शोले, दीवार, त्रिशुल, यादो की बारात सारख्या चित्रपटांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सलीम खान यांची गोष्टच वेगळी आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यात त्यांनी आपला मुलगा सलमान खानच्या करिअरविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. प्रख्यात पटकथाकार म्हणून सगळ्यांना माहिती असणाऱ्या सलीम खान यांनी सलमानसाठी कधीही स्क्रिप्ट लिहिलेली नाही.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

त्या मुलाखतीमध्ये त्यांना त्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्ही सलमानसाठी कधीही स्क्रिप्ट का लिहिली नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे. द बॉस डायलॉग्जला दिलेल्या त्या मुलाखतीनं नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. ते म्हणाले की, मी जेव्हा माझी स्क्रिप्ट घेऊन कुणाकडे जात असे तेव्हा मला ते दिग्दर्शक म्हणायचे की, तुमची स्क्रिप्ट कमाल आहे. मग मला प्रश्न पडला तो असा की, माझी स्क्रिप्ट जर एवढी कमाल आहे तर ते माझ्या मुलाला घेऊन चित्रपट का करत नाही?

त्यानंतर मात्र मी पुन्हा कधीही स्क्रिप्ट लिहायची नाही. असा निर्णय घेतला. असे सलीम खान यांनी सांगितले होते. सलमानसाठी स्क्रिप्ट लिहायची नाही याचे दुसरे कारण होते. ते म्हणजे त्यात खूपच धोका आहे. कारण त्याची फिल्म हिट झाली तर काही प्रॉब्लेम नाही. लोकं कौतुकच करतील. जर फिल्म फ्लॉप झाली तर मग काही खरं नाही. लोकं टीका करतील.

Salman Khan Father Salim Khan Explained
Tiger 3 Trailer: सलमान-इम्रान राहिले बाजूला,चर्चा रंगली कतरिनाच्या टॉवेल सीनची

माझ्यामुळे त्याचे करिअर फ्लॉप झाले असे लोकांनी त्याला म्हणायला नको. म्हणून मी माझ्यापुरते काही निर्णय घेतले. आणि त्यावर ठाम राहिलो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्याकडे तितका वेळही नाही. नातवांसोबत खूप वेळ जातो. बाकी कोणत्याही कामासाठी घरातली लोकं माझ्याकडे येतात. त्यांच्याशी बोलणं त्यांना सांगणं यातही वेळ जातो. रात्री केव्हाही फोन करुन भेटायला येतात. अशावेळी मला स्वताला लिहायला कधी वेळ मिळणार प्रश्न आहे. असे सलीम खान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.