Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan vs Ponniyin Selvan 2: सध्या बॉलिवूडमध्ये सलमान खानचा किसी की भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट गेल्या आठवड्यात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. भाईजानचा चित्रपट म्हटल्यावर बक्कळ कमाई करणार अशी अपेक्षा सर्वांनाच होती.
मात्र यावेळी सलमानच्या चित्रपटाच गणित बिघडलेलं दिसतयं. हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्शित करु शकलेला नाही. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली आहे.
हा चित्रपट चाहत्यांना काही खास मोहित करु शकलेला नाही असं बॉक्स ऑफिसच्या आकडेवरुन दिसत आहे.
'किसी का भाई किसी की जान'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीच्या अंदाजानुसार, या चित्रपटाच्या कमाईत चांगलिच घसरण झाली आहे.
बॉक्स ऑफिसवर 7व्या दिवशी केवळ 3.50 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. त्यावरुन आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 90.15 कोटी रुपये झाले आहे.
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल ट्विट केले आणि लिहिले, "#KisiKaBhaiKisiJan ने त्याची पहिली लक्षणीय घट नोंदवली आहे, ईदनंतर... या चित्रपटाचे प्रेक्षक कमी झाले. महानगरांमध्येही तीव्र घट नोंदवली गेली आहे. एकूण 93 कोटी आठवड्यात एकूण: ८४.४६ कोटी कमाई या चित्रपटाने केली आहे.
तर दुसरीकडे चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तामिळ आणि हिंदीसह पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
'पोनियिन सेल्वन: 2' ची कथा महान सम्राट राजा चोल यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातही कथा या राजाभोवती फिरताना दिसली होती.
आता दुसऱ्या भागात ही कथा पुढे सरकताना दिसणार आहे. लायका प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरपुर प्रतिसाद मिळाला होता. 'पोन्नियिन सेल्वन' आणि 'पोन्नियिन सेल्वन 2' हे दोन्ही चित्रपट प्रचंड बजेटमध्ये बनवले गेले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला.
म्हणजेच हे दोन्ही भाग बनवण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मणिरत्नम दिग्दर्शित 'पोनियिन सेल्वन'च्या दोन्ही भागांमध्ये ऐश्वर्या रायही मुख्य भूमिकेत दिसत आहे.
त्यामुळे आता पुन्हा ऐश्वर्या राय तिची मोहिनी पसरवु शकेल का हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर चाहत्यांना आता बॉक्स ऑफिसवर सलमान व्हर्सेस ऐश्वर्या अशी टक्करही दिसणार आहे.
2022 मध्ये रिलीज झालेल्या PS 1 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'विक्रम वेधा'शी टक्कर झाली होती. जागतिक स्तरावर या चित्रपटाने 450 कोटींहून अधिक कमाईचा शानदार व्यवसाय केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.