Salman Khan Helps Rahul Roy: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो मात्र त्याही पेक्षा जास्त तो त्याच्या उदारतेसाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी ओळखला जातो.
एकदाच नव्हे तर अनेक वेळा सलमान खान हा बऱ्याच बॉलिवूड कलाकारांच्या मदतीला धावून गेला आहे. त्यामुळेच त्याला भाईजानही म्हटलं जातं. तो सर्वाची मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो.
याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ब्रेन स्ट्रोकने त्रस्त असलेल्या राहुल रॉयची मदत भाईजानने केली आहे. राहुल रॉयच्या हॉस्पिटलचे बिल सलमान खानने भरल्याचा खुलासा खुद्द राहुल रॉय आणि त्याच्या बहिणीने केला आहे.
'आशिकी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा राहुल रॉय याला 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावेळी लडाखमध्ये त्याच्या 'LAC - लिव्ह द बॅटल' चित्रपटाच्या शूटिंग सुरु होतं. त्यावेळी राहुलला एअरलिफ्ट करावं लागलं आणि मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहूलनं सांगितलं की, या ब्रेन स्ट्रोक तो हॉस्पिटल बरेट दिवस होता आणि त्यावेळी हॉस्पिटलचे बिल सलमान खानने भरले होते.
त्यांची बहीण प्रियांका रॉय आणि मेव्हणा रोमीर सेन त्याची काळजी घेत होते. नुकतच प्रियांका आणि राहुल यांनी खुलासा केला की, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन गुप्ता यांनी सावधगिरी बाळगली असती आणि राहुलच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं नसतं तर हा ब्रेन स्ट्रोक टाळता आला असता.
या अपघाताविषयी बोलतांना राहुल रॉयच्या बहिणीने सांगितले की, 'एलएसीच्या शूटिंगदरम्यान राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
राहुलच्या हृदय आणि मेंदूची अँजिओग्राफी झाली. काही काळ तो नानावटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल होता. रुग्णालयात राहुलवर जवळपास दीड महिने उपचार सुरू होते.'
प्रियांकाने आठवण करून दिली की, ती आणि तिचा नवरा पैशाची जुळवाजुळव करत होते आणि चित्रपटाचा दिग्दर्शक नितीन गुप्तानेही मदत करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्याने दिलेले पैसे राहुलचे होते, जे त्याला फी म्हणून मिळणार होते. मात्र त्याने बातमींमध्ये मदत केल्याचे सांगितलं. मात्र नितीनच्या माध्यमातून पाठवलेले पैसे पुरेसे नव्हते.
हॉस्पिटलचे बिल बाकी होते. त्यावेळी सलमान खानने स्वतः राहुलला फोन करून त्याची विचारपुस केली होती. राहुलला कसली मदत हवी आहे का? हे विचारलं.
राहुल रॉयची बहीण प्रियांकाने सलमानच्या कौतुक पुल बांधले. ती म्हणाली की, 'सलमानने मीडियासमोर कधीही याबद्दल बोलले नाही. आम्ही सलमान खानकडे मदत मागितली नव्हती, तरीही तो अडचणीच्या वेळी आमच्या पाठीशी उभा राहिला.
हेच तुम्हाला खरा हिरो बनवते. फक्त कॅमेऱ्यासमोर उभं राहणं माणसाला स्टार बनवत नाही. पुढे ती म्हणते की, सगळे म्हणतात की सलमान असा आहे ,तसा आहे मात्र माझ्यासाठी तो खुप चांगला माणूस आहे.'
आशिकी या चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या छोतात आलेला राहुल रॉय आता खुपच कमी चित्रपटात दिसतोय. मात्र एकेकाळी तो आशिकी च्या यशानंतर त्याने 11 दिवसांत 47 चित्रपट साइन केले होते. मात्र आशिकीनंतर त्याच्या चित्रपटांना काही खास यश मिळालं नाही.
आशिकी या चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या छोतात आलेला राहुल रॉय आता खुपच कमी चित्रपटात दिसतोय. मात्र एकेकाळी तो आशिकी च्या यशानंतर त्याने 11 दिवसांत 47 चित्रपट साइन केले होते. मात्र आशिकीनंतर त्याच्या चित्रपटांना काही खास यश मिळालं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.