अभिनेता सलमान खान याला रविवारी त्याच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली होती.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला रविवारी सर्पदंश झाला होता. त्याच्या पनवेलमधील (Panvel) फार्महाऊसवर ही घटना घडली होती. दंश केलेला साप बिनविषारी होता त्यामुळे पुढचा धोका टळला. सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानला (Snake bite to Salman Khan) एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. आता सलमान खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सापाने तीन वेळा दंश केल्याचं सलमानने एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.
सलमान खान म्हणाला की,'फार्महाऊसमध्ये साप शिरला होता. त्याला काठीने बाहेर काढत होतो. त्यावेळी तो माझ्या हाताजवळ आला. तेव्हा मी तो बाजुला ढकलला पण तो मला तीन वेळा चावला.' सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथं काही प्राथमिक उपचार केल्यानंतर सलमानला घरी सोडण्यात आलं.साप विषारी असावा असंही सलमान खानने म्हटलं आहे. तसंच रुग्णालयात जवळपास सहा तास उपचार घेतल्याचंही त्याने सांगितलं आहे. उपचार घेतल्यानंतर प्रकृती ठीक असल्याची माहितीसुद्धा सलमान खानने दिली आहे. सलमानचा आज वाढदिवस असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पनवेलच्या फार्महाऊसवर दंश केलेल्या सापाला पकडण्यात आलं. त्याला बाटलीमध्ये बंद करून एमजीएम रुग्णालयात ठेवलं आहे. तो विषारी होता की नाही हे पाहण्यासाठी त्याला बाटलीत बंद करून आणल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप साप विषारी आहे की नाही याबाबत काही माहिती समोर आली नाहीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.