सलमान खानचा नवा चित्रपट 'अंतिमः द फायनल ट्रूथ' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमानने वेळ काढून अहमदाबादमधील 'साबरमती' आश्रमाला भेट दिली. विशेष म्हणजे सलमानने यावेळी चरखालाही चालवला. साबरमती आश्रमात महात्मा गांधी १९१७ ते १९३० पर्यंत वास्तव्यास होते. या भेटीदरम्यान सलमानसोबत 'अंतिम'चे दिग्दर्शक महेश मांजरेकर सुद्धा उपस्थित होते.
साबरमती आश्रमाच्या भेटीने सलमाननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे त्याने यावेळी चरखा चालवला आणि सूतकताई केली. सलमानने येथील व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली. साबरमती आश्रमाकडून त्याला चरखाअसलेलं स्मृतिचिन्ह आणि गांधीजींवरील पुस्तक भेट देण्यात आले.
सलमान आणि आयुष शर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या अंतिम: द फायनल ट्रूथ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या विकेंडअखेर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. सत्यमेव जयते २ आणि दिवाळीला रिलीज झालेल्या सूर्यवंशी यांच्या स्पर्धेला तोंड देत अंतिमने तीन दिवसांत १८.६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.