Sam Bahadur Box Office: विकी बहादूरीने करतोय 'अ‍ॅनिमल'चा सामना! तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!

'अ‍ॅनिमल' गाजतोय पण 'सॅम बहादूर'लाही कमी लेखू नका!
Sam Bahadur Box Office Collection Day 3:
Sam Bahadur Box Office Collection Day 3: Esakal
Updated on

Sam Bahadur Box Office Collection Day 3: सध्या चित्रपटगृहात दोन मोठे सिनेमे एकमेकांसोबत स्पर्धा करताना दिसत आहे. ज्यात एक आहे रणबीर कपूरचा 'अनिमल' तर दुसरा आहे विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'. दोन्ही सिनेमांची कथा पुर्ण वेगळी असली तरी दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. हे सिनेमे बॉक्स ऑफिस एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहे.

जरी रणबीर कपूरचा 'अनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत असला तरी सॅम बहादूरही आपले स्थान निर्माण करत आहे. पहिल्या दिवसाची कमाई संथ असली तरी विकेंडला सॅम बहादूरच्या कमाईत वाढ झालेली दिसत आहे.

Sam Bahadur Box Office Collection Day 3:
Animal Box Office Collection Day 3: 'अ‍ॅनिमल'नं केली मोठमोठ्या सिनेमांची शिकार, तिसऱ्या दिवशी किती कोटींची केली कमाई?

विकी कौशलचा 'सॅम बहादूर' 1 डिसेंबर चित्रपटगृहात रिलिज झाला. रिलिज झाल्यानंतर या चित्रपटाला समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी चाहत्यांनी सुरुवातीला चित्रपटाला काही खास प्रतिसाद दिला नाही.

मात्र, आता हळूहळू प्रेक्षक या चित्रपटाकडे वळत आहेत. तिसऱ्या दिवशी विकीच्या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे.

Sam Bahadur Box Office Collection Day 3:
Harnaaz Sandhu: मिस युनिव्हर्स हरनाज करतेय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला डेट? त्या पोस्टनं सांगून टाकलं....

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'सॅम बहादूर'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6.25 कोटींची कमाई केली तर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी ' 9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

SACNL च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सॅम बहादूर' ने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी 10.30 कोटी रुपये कमवले आहेत. या कमाईसह चित्रपटाने तीन दिवसांत एकूण कमाई 25.55 कोटी रुपये झाली आहे.

Sam Bahadur Box Office Collection Day 3:
Rohan Gujar Wife: "खुप सहन करावं लागतंय...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीची कॅन्सरशी झुंज

'सॅम बहादूर'ची कथा भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. 'सॅम बहादूर'चे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. 'राझी'नंतर मेघना आणि विकी यांनी 'सॅम बहादूर' या चित्रपटात काम केले आहे.

चित्रपटाची कथा मेघना यांच्यासह भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटात सान्या मल्होत्रा ही सॅमची पत्नी सिल्लू माणेकशॉच्या भूमिकेत आहे. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका फातिमा सना शेखने साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.