Samantha : गुरुजींच्या सल्ल्यानंतर समंथाने घेतला पुढे जाण्याचा निर्णय; करणार दुसरे लग्न?

भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला
Samantha Second Marriage News
Samantha Second Marriage NewsSamantha Second Marriage News
Updated on

Samantha Second Marriage News अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूबद्दल (Samantha Ruth Prabhu) बातमी आली होती की ती गंभीर आजाराने ग्रस्त आहे. या आजारावरील उपचारासाठी ती सध्या परदेशात आहे. मात्र, तिच्या टीमने हे वृत्त फेटाळून लावले होते. आता समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मिडियावर तिच्याबद्दलच बोलले जात आहे. असे बोलले जात आहे की, समांथाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने (Samantha Ruth Prabhu) आयुष्यात पुढे जाण्याचे ठरवले आहे. ती दुसरे लग्न करण्याचा विचार करीत आहे. या कठीण काळात तिला जवळचा मित्र मदत करीत आहे. समंथाचे गुरू जगदीश वासुदेव यांनी सर्व काही विसरून आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुन्हा लग्न (Marriage) करण्यास सांगितले आहे.

Samantha Second Marriage News
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीची राजकारणात एंट्री? तेजस्वी सोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

गुरुजींच्या सांगण्यावरून समंथाने होकार दिला आहे. ती लग्नाबाबत विचार करीत असल्याचे समजते. तिने भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. समांथा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. यातील सर्वाधिक चर्चा तिच्या खासगी आयुष्याच्या असतात, हे विशेष...

वर्षभरापूर्वी लग्न मोडले

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नात सुमारे १० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. दोघांनी गोव्यात दोन रीतीरिवाजानुसार लग्न केले. त्यांचे लग्न केवळ ४ वर्षेच टिकू शकले. २०२१ मध्ये दोघांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.