Shaakuntalam: तिसऱ्या दिवशी 'शाकुंतलम'नं बॉक्स ऑफिसवर सोडला जीव! जमवला फक्त इतक्या कोटींचा गल्ला

Shaakuntalam BO Collection:
Shaakuntalam BO Collection:Esakal
Updated on

Shaakuntalam BO Collection: साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू स्टारर चित्रपट 'शाकुंतलम' या साउथमधला या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. या पौराणिक नाटकाची लोक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करु शकलेला नाही असं काहीस चित्र कलेक्शनच्या आकड्यावरुन दिसतं आहे.

सामंथाच्या 'शाकुंतलम' चित्रपटाची सुरुवात फारशी खास नसली तरी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं काही घडलेलं दिसत नाही. उलट वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत कमालीची घट झाली आहे.

Shaakuntalam BO Collection:
Alia Bhatt Gift: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रणबीरनं आलियाला दिलं 'इतक्या' लाखांचं गिफ्ट! व्हिडिओ व्हायरल

'शकुंतलम' तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत मोठ्या संख्येने स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तथापि, पहिल्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी आकर्षित करण्यात चित्रपट अयशस्वी ठरला आणि सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने केवळ 3 कोटी रुपये कमावले.

Shaakuntalam BO Collection:
Baba Siddique Iftar Party: इफ्तार पार्टी बाबा सिद्दिकींची पण हवा भाईजानची

चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी फक्त 1.85 कोटी रुपये कमावले. त्याचबरोबर चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडेही आले आहेत. रिपोर्टनुसार 'शाकुंतलम' तिसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी फक्त 2 कोटी कमवू शकतो. यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 6.85 कोटी रुपयांच्या जवळपास पोहचली आहे. त्यामुळे सामंथाचा हा चित्रपट तिच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामिल झाला आहे असं बोललं जात आहे.

शकुंतलम बद्दल बोलायचं झाल्यास हा सिनेमा तेलुगु पौराणिक नाटक आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले तर गुणा टीमवर्क्स अंतर्गत नीलिमा गुणा यांनी याचित्रपटाची निर्मित केले आहे

Shaakuntalam BO Collection:
Mahima Chaudhary: 'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं दुःखद निधन

कालिदासाच्या अभिज्ञान शकुंतलम या अतिशय लोकप्रिय नाटकावर आधारित, या चित्रपटात शकुंतलाच्या भूमिकेत सामंथा आणि पुरू घराण्यातील राजा दुष्यंतच्या भूमिकेत देव मोहन आहे. त्याचबरोबर मोहन बाबू, जिशू सेनगुप्ता, मधु, गौतमी, आदिती बालन आणि अनन्या नागल्ला यांच्यासोबत इतर अनेक कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.