Shaakuntalam BO Collection: समांथाच्या 'शाकुंतलम'ची दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाईट अवस्था, केली इतकी कमाई

'शाकुंतलम' या चित्रपटाचा ओपनिंग डे चांगला होता, पण दुसऱ्या दिवशी कलेक्शन खूपच कमी होते.
samantha
samantha Sakal
Updated on

साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू स्टारर चित्रपट 'शाकुंतलम' या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. या पौराणिक नाटकाची लोक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीचा दिवस अप्रतिम होता, पण दुसऱ्या दिवस खराब होता. जाणून घ्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती व्यवसाय केला.

समंथाच्या 'शाकुंतलम' या तेलगू चित्रपटाबाबत अपेक्षा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल, पण तसे होताना दिसत नाही. चित्रपटाची सुरुवात फारशी खास नव्हती. वीकेंडला चित्रपटाची कमाई सर्वाधिक अपेक्षित आहे, पण 'शाकुंतलम' वीकेंडला फारशी कमाई करू शकला नाही. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन खूपच कमी होते, त्यामुळे चित्रपटाला धक्का बसू शकतो.

samantha
PS-2 Anthem Song: 'PS-2' चे अँथम सॉंग झाले रिलीज, एआर रहमानच्या आवाजानं जिंकली चाहत्यांची मनं

अहवालानुसार शाकुंतलमने शनिवारी 1.50 कोटी रुपयांचा बिझनेस केला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५ कोटींची कमाई केली होती. आता निर्मात्यांची नजर रविवारच्या कलेक्शनवर आहे. बघूया चित्रपटाचं काय होतं ते.

samantha
Lara Dutta Birthday: मिस युनिव्हर्स झाली आणि नशीब पालटलं.. असा आहे अभिनेत्री लारा दत्ताचा जीवनप्रवास..

'शाकुंतलम'चे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे, तर नीलिमा गुणा आणि दिल राजू हे त्याचे निर्माते आहेत. या चित्रपटात सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहे. ती शकुंतलाची भूमिका साकारत आहे. त्यांच्याशिवाय अभिनेता देव मोहन (दुष्यंत), अदिती बालन, सचिन खेडेकर, प्रकाश राज, अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा, गौतमी मधु आणि मोहन बाबू हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 80 कोटीत तयार झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()