Samantha Ruth Prabhu: आधी फोटोत शिरला अन् नंतर चष्मा पळवला, बालीत फिरायला गेलेल्या समंथासोबत माकडचेष्टा

समंथा ब्रेक घेऊन सुट्टीवर गेली असली तरी तिला माकडांनी सतवलं आहे
Samantha Ruth Prabhu Her Sunglasses Were Stolen By A Monkey In Bali
Samantha Ruth Prabhu Her Sunglasses Were Stolen By A Monkey In BaliSAKAL
Updated on

Samantha Ruth Prabhu Monkey Video Viral: समंथा रुथ प्रभु ही भारतातल्या लाखो तरुणांची क्रश आहे. समंथाचे नवीन सिनेमे कधी येतात याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. समंथाने काही दिवसांपुर्वी जाहीर केलं की, मनोरंजन विश्वातुन ती काही काळ ब्रेक घेणार आहे.

समंथा सध्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत आहे. समंथा सध्या इंडोनेशिया मधील बाली शहरात फिरायला गेलीय. तिथे समंथासमोर माकड आला आणि पुढे जी काय फजिती झाली ती जाणुन घ्या.

(Samantha Ruth Prabhu Her Sunglasses Were Stolen By A Monkey In Bali)

Samantha Ruth Prabhu Her Sunglasses Were Stolen By A Monkey In Bali
Rohit Shetty: रोहीत शेट्टी मॉरीशस पंतप्रधानांच्या भेटीला, कारण ऐकुन फॅन्स खुश होतील

समंथाची रोड ट्रिप

बुधवारी, समंथा रुथ प्रभूने अनुषासोबत बालीमधील उलुवाटूला भेट दिली. दोघांनी या रोड ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सामंथा ऑलिव्ह ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर काळा चष्मा आहे. समंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

माकड चष्मा घेऊन पळाला

तिच्या इन्स्टा स्टोरीवरील एका व्हिडिओ क्लिपमध्ये समंथा खडकाच्या काठावर उभी असताना मागे वाहणाऱ्या पाण्याची झलक दिली आहे. समंथाने पुढे सांगितले की, कसे एक माकड तिचा काळा चष्मा घेऊन पळून गेला.

याशिवाय तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती अनुषासोबत पोज देत आहे, तर मागून एक या फोटोत माकड डोकावताना दिसत आहे. या चतुर माकडाची समंथाने स्तुती केलीय

समंथाने केलं माकडाचं कौतुक

समंथा लिहिते, 'मी याच ठिकणी शेवटी माझा चष्मा शेवटी पाहिला होता.' पुढच्या व्हिडिओत, चतुर माकड तिचा चष्मा धरताना दिसत आहे तर एक माणूस माकडाकडून चष्मा परत घेण्याचा प्रयत्न करतोय.

समंथाने या क्लिपवर लिहिले आहे की, 'ठीक आहे... माकडाची निवड खरोखरच चांगली आहे.' एकुणच बालीला सुट्टीचा आनंद घेत असलेल्या समंथाला माकडांनी छळलेलं दिसतेय.

सध्यातरी समंथाला तिच्या शरीरासाठी आणि आजारासाठी वेळ द्यायचा आहे. समंथा किमान 6 महिन्यांसाठी ब्रेकवर असणार असल्याचं समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.