आपल्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या एका गाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा' या चित्रपटात तिचं 'ओ अंतावा' (oo antava) हे आयटम साँग आहे. समंथाने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच आयटम साँगची ऑफर स्विकारली आहे. त्यामुळे या गाण्यातील तिच्या बोल्ड लूकचीही तेवढीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावरील काहींना समंथाचा हा हटके आणि कधी न पाहिलेला अंदाज खूपच आवडतोय. तर काहींनी तिच्या बोल्ड दृश्यांवर नाराजी व्यक्त केली. मात्र प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सर्वच प्रतिक्रियांचा स्वीकार समंथाने केला आहे. इतकंच नव्हे तर 'सेक्सी' लूकसाठी ट्रोल करणाऱ्यांनाही ती उपरोधिक उत्तर दिलं आहे.
या तेलुगू गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानत समंथाने सोशल मीडियावर लिहिलं, 'मी चांगल्या भूमिका केल्या, वाईटही केल्या, विनोदी आणि तितकेच गंभीर पात्रसुद्धा साकारले, मी चॅट शोचं सूत्रसंचालनही केलं. मी जे जे प्रोजेक्ट स्वीकारले, त्या प्रत्येकात स्वत:चं कौशल्य दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण पडद्यावर सेक्सी दिसणं हे त्यापुढील कठीण काम आहे. तुम्हा सर्वांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल धन्यवाद', अशी पोस्ट तिने लिहिली.म
या गाण्यासाठी अल्लू अर्जुनच्या टीमकडून अनेकदा समंथाला विचारण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला तिने नकार दिला होता. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर या गाण्याची ऑफर स्विकारल्याने तिची अधिकाधिक चर्चा होऊ लागली. "अल्लू अर्जुनसोबत डान्स करणं हे खूपच कठीण आणि थकवणारं आहे", असा अनुभव तिने 'बॉलिवूड लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.