अभिनेत्री संभावना सेठच्या Sambhavna Seth वडिलांचं कोरोनाने निधन झालं. "माझ्या वडिलांचा जीव वाचवता येऊ शकला असता. फक्त कोरोनामुळे त्यांचे प्राण नाही गेले", अशा शब्दांत तिने दु:ख व्यक्त केलं. काही दिवसांपूर्वी संभावना दिल्लीत तिच्या वडिलांसाठी हॉस्पिटल बेडच्या शोधात होती. त्यामुळे अपुऱ्या पडणाऱ्या वैद्यकिय सुविधांकडे सूचित करणारी तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे. (Sambhavna Seth says her father could have been saved not just Covid 19 that killed him)
संभावनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या वडिलांना वाचवता येऊ शकलं असतं. फक्त कोव्हिडने त्यांना मारलं नाही.' अनेक सेलिब्रिटींनी यावर कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. राखी सावंत, सुशांत दिवगीकर, राम कमल मुखर्जी, जसलीन मथारू, निशा रावल यांसारख्या सेलिब्रिटींनी संभावनाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा : मराठी अभिनेत्याची एक्स्प्रेस वेवर लूट; ५० हजार रुपये घेऊन आरोपी पसार
८ मे रोजी संभावनाच्या वडिलांचं निधन झालं. पती अविनाश द्विवेदीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली होती. 'आज ५.३७ वाजता, संभावनाच्या वडिलांचं कोव्हिड १९ आणि कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो', अशी पोस्ट त्याने लिहिली होती. वडिलांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी संभावनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्यासाठी हॉस्पिटल बेडच्या शोधात असल्याचं सांगितलं होतं. 'दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये कोणी बेड मिळवण्यासाठी मदत करू शकता का? कारण हे हॉस्पिटल माझ्या घराजवळ असून माझ्या वडिलांना ताबडतोब दाखल करायची गरज आहे. हॉस्पीटलबाहेर ते माझ्या भावासोबत वाट पाहत थांबले आहेत', असं तिने लिहिलं होतं. सोशल मीडियामुळेच तिच्या वडिलांना बेड मिळू शकला, असं म्हणत तिने नंतर नेटकऱ्यांचे आभार मानले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.