Same Sex Marriage : 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण...' सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बॉलीवूडमधील सेलिब्रेटीचं काय आहे म्हणणं?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
Same Sex Marriage bhumi pednekar to richa chaddha
Same Sex Marriage bhumi pednekar to richa chaddhaesakal
Updated on

Same Sex Marriage bhumi pednekar to richa chaddha : सेम सेक्स मॅरेज यावर एलजीबीटीक्यूच्या काही सदस्यांकडून न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यायालयानं सेम सेक्स मॅरेज यावर आपला नकार दर्शवत काही महत्वाच्या सुचना या केंद्रसरकारला दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. पाच न्यायधीशांच्या पीठानं जो निर्णय दिला त्यामुळे समस्त एलजीबीटीक्यु बांधवांची निराशा झाली असून त्यांनी आपण आपली लढाई सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

आम्हाला समलैंगिक विवाहाला मान्यता देणार येणार नाही. त्याबाबतचा कायदा आम्ही करु शकत नाही. तो अधिकार आमचा नाही. असे न्यायालयानं म्हटले होते. यावर बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर, सेलिना जेटली, रिचा चढ्ढा आणि तिचा पती अली फझल यांच्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

भूमिनं बधाई दो नावाच्या चित्रपटामध्ये एका लेस्बियन मुलीची भूमिका साकारली होती. भूमिनं यापूर्वी देखील सोशल मीडियावरुन आणि तिच्या काही मुलाखतींमधून सेम सेक्स मॅरेजचे समर्थन केले आहे. आता तिनं इंस्टावर कोर्टाच्या निर्णयाचा स्क्रिनशॉट शेयर केला आहे. आणि म्हटले आहे की, सगळ्यांसाठी समानता हवीच, कारण प्रेम हे प्रेम असतं. आणि ते सगळ्यांसाठी सारखेच हवे.

माय ब्रदर निखिल आणि पाईन यासारख्या चित्रपटांतून एलजीबीटीक्यू विषयांवर चित्रपट निर्मिती करणाऱ्या ओनिरनं कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यानं लिहिलं आहे की, निराशा...अभिनेत्री सेलिना म्हणाली की, सुप्रीम कोर्टानं निराशा केली आहे. इंडिया टुडेशी बातचीत करताना तिनं म्हटले आहे की, जो निर्णय झाला आहे तो निराशावादी आहे.

रिचा आणि तिचा पती अली फझल यांनी स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केले आहे. या अॅक्टमधील एका नियमानुसार अभिनेत्रीनं नाराजी व्यक्त केली आहे. रिचानं म्हटलं आहे की, महिनाभर तुमचे नाव नोटीसबोर्डावर झळकत राहते. हा कोणता नियम आहे, भारतात लग्नापेक्षा ऑनर किलिंगच्या घटना जास्त आहेत म्हणून आहे का हे, त्यामुळेच की काय तुमचे नाव नोटीस बोर्डावर महिनाभर असते का, असा प्रश्न तिनं विचारला आहे.

Same Sex Marriage bhumi pednekar to richa chaddha
Same Sex Marriage : समजा सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहाला मान्यता दिली असती तर काय झाले असते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.