Sameer Wankhede CBI Investigation Alligation NCB cut suspects list : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडे नावाच्या अधिकाऱ्याची आता सीबीआयकडून चौकशी सुरु झाली आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती आतापर्यत समोर आली आहे. वानखेडेंच्या टीमकडून शाहरुखकडे तब्बल २५ कोटींची मागणी केल्याचे त्या सीबीआयच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
आता पुन्हा एकदा सीबीआयनं वानखेडे यांनी त्या कॉर्डेलिया क्रुझवर जी कारवाई केली होती त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये जी संशयित आरोपींची नावं होती ती वगळण्यात आल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला संशयित आरोपींची नावं २७ होती मग तो आकडा १० वर कसा आला असा प्रश्न सीबीआयनं चौकशी दरम्यान त्यांना केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वानखेडे आणि त्याच्या टीमवरील कारवाईची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
आर्यन खानला अटक केल्यानंतर देशभरामध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्या घटनेकडे हायप्रोफाईल केस म्हणून पाहू जाऊ लागले. त्यात अनेकांची नावं आली होती. या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्नही झाला होता. बॉलीवूडमध्ये देखील या घटनेचे पडसाद उमटले होते. सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले होते. दर सुनावणीच्यावेळी किंग खान शाहरुखच्या घराबाहेर प्रचंड गर्दी होत होती.
चाहत्यांनी किंग खानला पाठींबा दिला होता. या कारवाईमध्ये जाणीवपूर्वक आर्यन खानला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे अनेकांचे म्हणणे होते. त्यात आता सीबआयच्या चौकशीतून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुरुवातीला एनसीबीला ज्या संशयित आरोपींची नावं कळली होती त्यातून काही नावं वगळल्याचे सीबीआयनं म्हटले गेले आहे. पहिल्या यादीत तर २७ नावं होती त्यात बदल होऊन ती संख्या १० वर कशी आली असा प्रश्न सीबीआयनं केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, सीबीआयनं जो गुन्हा दाखल केला आहे त्या तक्रारीमध्ये वानखेडे यांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. ज्यानं आर्यन खानच्या मित्राला ड्रग्जचा पुरवठा केला त्या व्यक्तीला अटक केली गेली नाही. त्याबाबतचा तपास हा संशयास्पद आहे. वानखेडे आणि त्यांच्या टीमनं सिद्धार्थ शहाला अटक केली नव्हती. त्यानं आपण आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटला ड्रग्जचा पुरवठा केल्याचे सांगितले होते. एनसीबीनं देखील मर्चंटकडून त्यावेळी सहा ग्रॅम चरस जप्त केल्याचे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.