Sameer Wankhede: 'शाहरुखसोबत डील मी नाही तर..',सीबीआय समोर समीर वानखेडेंनी ओपन केलेल्या सीक्रेटनं उडवली खळबळ

समीर वानखेडे यांनी आर्यन खानची ड्रग्स केसमधून निर्दोष सुटका करण्यासाठी २५ करोडची मागणी शाहरुखकडे केली होती असा आरोप झाला आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeEsakal
Updated on

Sameer Wankhede: ड्रग्स केस प्रकरणातून आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ करोडची डील केल्या प्रकरणात सीबीआयनं चौकशी सुरु केली आहे. ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांच्या आधारावर एक गोष्ट तर लक्षात येतेय की समीर वानखेडेंनी अनेक खुलासे केले आहेत.

समीर वानखेडे म्हणाले आहेत की,''आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुख खानसोबत डील त्यांनी नाही तर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. आर्यन खानची सुटका करणं किंवा त्याला शिक्षा देणं हे कोर्टाचं काम होतं,पण पहिल्यांदा एनसीबीनं कोर्टाचा हा अधिकार स्वतःकडे घेतला आणि आर्यनला निर्दोष म्हटलं''.

वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार आर्यन खानला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप घाई केली जात होती कारण दिल्लीच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी डील केली होती.

दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या आठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजता समीर वानखेडेंची चौकशी सुरू केली. ही विचारपूस तीन तास चालली. यानंतर एक तासाचा ब्रेक होता आणि त्यानंतर दुपारी अडीच वाजता पुन्हा चौकशी सुरू झाली.(Sameer Wankhede interrogated by cbi today on saturday reveals new secrets on aryan khan drugs case)

Sameer Wankhede
Amitabh Bachchan च्या नातीनं शहराच्या लक्झुरियस लाइफकडे फिरवली पाठ.. गावाकडं गेली अन् चक्क.. व्हिडीओ पाहून जो-तो थक्क

सीबीआय चौकशीत त्या आरोपामागचं सत्य नेमकं काय याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि या विषयाच्या मुळाशी पोहोचण्याचा देखील प्रयत्न सीबीआय करत आहे.

आरोप केला गेलाय की समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणातून आर्यन खानची सुटका करण्यासाठी शाहरुख खान कडून २५ करोडची मागणी केली होती आणि अखेर १८ करोडमध्ये डील फायनल केली गेली.

पण चौकशीत समीर वानखेडे यांनी पलटवार करत एनसीबीच्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर डील करण्याचा आरोप केला आहे.

वानखेडे म्हणाले की, ''एनसीबीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे की जेव्हा कोणावर आरोप लागले त्यानंतर कोर्टांनं नाही तर एनसीबीनं क्लीन चिट दिली. कोणाच्या दबावाखाली येऊन एनसीबीनं आर्यन खानला क्लीन चीट दिली? याआधी कोणत्या केसमध्ये एनसीबीनं अशी क्लीन चिट दिली होती. असं पहिल्यांदाच घडत आहे. डील मी नाही तर एनसीबी व्हिजलन्स टीम आणि नंतर आर्यन खान केसमध्ये तपास करण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आलेल्या टीमनं केली आहे;'.

Sameer Wankhede
The Kerala Story Box office Collection: बाबो..समोर येईल त्या सिनेमाला आपटतोय द केरळ स्टोरी..कमाईचा तांडव सुरुच

''त्यांच्यावरती आर्यनला केसमध्ये क्लीन चिट देण्याचा दबाव होता. खुद्द डीजीनं आर्यनला क्लीन चिट दिली,जेव्हा हे काम खरंतर कोर्टाचं होतं''.

''शाहरुख खाननं मला संपर्क केला होता, मी स्पष्ट बोललो होतो की आम्ही अटक करत आहोत आर्यनला. जर आमचा तपास चुकीचा ठरला तर कोर्ट निर्णय घेईल. पण एका मोठ्या दबाव यंत्रणेखाली एनसीबीची टॉपची टीमच कोर्ट बनली''.

''मी कोर्टात मोठे डिजिटल एसिडेंस ठेवणार आहे,ज्यामुळे सगळ्यांची पोल खोल होईल. शाहरुख सोबतचं चॅट डिटेल्स मी विजिलेंस टीमच्या डीडीजी ज्ञानेश्वर सिंहला दिल्या आहेत. पण त्यांनी ऑन रेकॉर्ड काही ठेवलं नाही, कारण जर ठेवलं असतं तर माझी केस मजबूत झाली असती. आणि त्या चॅटविषयी एनसीबीचे डायरेक्टर ते इतरही सगळ्या बड्या अधिकाऱ्यांना माहित होतं''.

Sameer Wankhede
The Kerala Story विरोधात पुण्याच्या FTII मध्ये विदयार्थी आक्रमक.. स्पेशल स्क्रिनिंग बंद पाडण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.