Sameer Wankhede on Jawan: "बेटे को हाथ लगाने से पहले" डायलॉगवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

समीर वानखेडेंनी 'जवान'मधल्या 'त्या' डायलॉगवर मौन सोडलंय
sameer wankhede reaction of jawan dialogue bete ko haath lagane se pehle baap se baat kar
sameer wankhede reaction of jawan dialogue bete ko haath lagane se pehle baap se baat karSAKAL
Updated on

Sameer Wankhede on Jawan: शाहरुख खानचा जवान सिनेमा चांगलाच गाजला. २०२३ मध्ये जवानने १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. जवान सिनेमा २०२३ चा एक ब्लॉकबस्टर सिनेमा ओळखला जातो.

जवान सिनेमा आला तेव्हा त्यातला एक डायलॉग प्रचंड गाजला. तो म्हणजे बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये असलेला हा डायलॉग जेव्हा सिनेमात ऐकायला मिळाला तेव्हा लोकांनी एकच जल्लोष केला. या डायलॉगबद्दल NCB अधिकारी समीर वानखेडेंनी त्यांचं मत मांडलंय.

sameer wankhede reaction of jawan dialogue bete ko haath lagane se pehle baap se baat kar
Dunki Review: राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा 'डंकी' पाहायचा प्लॅन करताय? वाचा हा रिव्ह्यू

समीर वानखेडेंची जवानबद्दल प्रतिक्रिया

शाहरुख खानचा 'जवान'मधला “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर” हा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला. समीन वानखेडेंनी अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. त्यामुळे हा डायलॉग त्याला उद्देशून आहे असं अनेकांनी गृहीत धरलं.

अखेर या प्रकरणातील आर्यनच्या प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांनी या संवादावर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखच्या 'जवान'मधील डायलॉगचे वर्णन समीर वानखेडेंनी "रोडछाप" असे केले होते.

'जवान' मधील हा डायलॉग जेव्हा व्हायरल झाला तेव्हा SRK ने त्याचा मुलगा आर्यन खानवर जे आरोप झाले आणि क्रूझवरुन आर्यनला ज्या अधिकाऱ्यांनी अटक केली त्यांना उद्देशून हा डायलॉग सिनेमात पेरला असं सांगण्यात आलं. आर्यनला अटक करण्याची कारवाई समीर वानखेडेंनी केली होती. त्यामुळे हा डायलॉग त्यांना उद्देशून आहे असं बोलण्यात आलं. अखेर समीर वानखेडेंनी या प्रकरणावर रितसर कमेंट केलीय.

शाहरुख खानच्या ‘जवान’ मधील त्या डायलॉगवर प्रतिक्रिया विचारली असता समीर म्हणाले. , "हा संवाद मला अगदी रस्त्याच्या कडेला सडकछाप लोकं जशी भाषा बोलतात तसा वाटतो. मी ना चित्रपट पाहिलाय ना कुठला संवाद ऐकलाय. मला या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. पण जर कोणी माझ्यावर हा निशाणा साधले असेल, तर मला इंग्रजीत प्रतिक्रिया द्यायला आवडेल.”

समीरने शेवटी म्हणाले, "मी बरीच घरे आणि पूल जाळले आहेत आणि मी त्या जळलेल्या घरांवर आणि पुलांवर नाचलो आहे. म्हणून मला नरकाची भीती वाटत नाही, म्हणून कृपया मला घाबरू नका."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.