मुंबई : एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी अभिनेता शाहरुख खानचा (actor shahrukh khan) मुलगा आर्यनवर ड्रग्स प्रकरणी कारवाई केली आहे. मात्र, शाहरुखचा वानखेडेसोबत हा पहिलाच सामना नाही. जवळपास १० वर्षांपूर्वी वानखेडेंनी शाहरुखला मुंबई विमानतळावर थांबवले होते. त्यावेळी शाहरुखची अनेक तास विमानतळावरच चौकशी करण्यात आली होती.
जुलै 2011 मध्ये शाहरुख आपल्या कुटुंबासह हॉलंड आणि लंडनला फिरायला गेला होता. तो परतल्यानंतर समीर वानखेडे यांनी त्याला मुंबई विमानतळावर थांबवले होते. त्यावेळी समीर वानखेडे हे कस्टम सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. शाहरुखजवळ २० बॅग होत्या आणि त्याने काही विदेशी वस्तू कस्टम ड्युटी चुकविण्यासाठी लपविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे यांनी शाहरुखची अनेक तास चौकशी केली. कस्टम ड्युटी चुकवल्याबद्दल त्याचे सर्व सामान तपासण्यात आले. शेवटी अनेक तासांच्या चौकशीनंतर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यावेळी देखील दीड लाख रुपये कस्टम ड्युटी भरण्यास सांगण्यात आले.
विमानतळ सीमाशुल्कासाठी वानखेडे यांनी अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मिनिषा लांबा आणि गायक मिका सिंग यांचा समावेश आहे. अनेकांची दागिने आणि विदेशी चलनाच्या आरोपाखाली चौकशी करण्यात आली होती. टोरंटोहून भारतात परतत असताना अनुष्काला जुलै 2011 मध्ये 40 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने घेऊन जाण्याच्या आरोपावरून रोखण्यात आले होते. 2013 मध्ये वानखेडे यांनी मिकाला विमानतळावर विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यानुसार (फेमा) विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलन बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.