Sameera Reddy: समीरा रेड्डीनं २००२ साली बॉलीवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. 'मैने दिल तुझको दिया' हा तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिची भूमिका एका साध्या-सरळ सोज्वळ मुलीची होती.
पण त्यानंतर 'मुसाफि'र',टॅक्सी नंबर ९२११' आणि 'रेस' सारख्या सिनेमातून मोठ्या पडद्यावर समीरा रेड्डी दिसली आणि तिला 'सेक्सी सिम्बॉल' संबोधलं जाऊ लागलं. २०१२ साली आलेल्या 'चक्रव्यूह' सिनेमानंतर समीरा रेड्डी इंडस्ट्रीपासून दूर गेली.
तिचं वजन वाढलेलं दिसलं...प्रेग्नेंसीमुळे तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. समीरा रेड्डीला सोशल मीडियावर तिच्या वाढत्या वजनामुळे आणि लुक्समुळे ट्रोल केलं गेलं. पण अभिनेत्रीनं स्वतःचा जशी आहे तसा केवळ स्विकार केला नाही तर बॉडी पॉझिटिव्हिटी संदर्भात तगडा संदेशही समाजाला दिला.
आपल्या नुकत्याच एका मुलाखतीत समीरा रेड्डीनं १० वर्षापूर्वी एक असा काळ आला होता की बॉलीवूडमध्ये अनेकांना प्लास्टिक सर्जरी करवून घेण्याचं वेड लागलं होतं असा मोठा खुलासा करत अनेक गोष्टी बिनधास्त बोलून दाखवल्यात. (Sameera reddy reveals 10 years ago there was crazy phase where every body was to get plastic surgery)
समीरा रेड्डीनं सेक्सी सॅम ते मेसी मम्मा पर्यंतचा मोठा प्रवास केला आहे. दोन मुलांची आई समीरा रेड्डी सध्या सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती बॉडी पॉझीटिव्हिटीपासून ते सेक्स आणि प्लेजर सारख्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधताना दिसते. हे असे विषय आहेत ज्यांच्यावर सोशल मीडियावरही बोलायला कुणी फारसं पुढाकार घेत नाही. समीराला आपल्या पांढऱ्या केसांची कधीच अडचण होत नाही. दिखावेगिरीवर तिचा विश्वास नाही असं देखील ती बिनधास्त बोलून दाखवते.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत समीरा म्हणाली आहे,''मला वाटतं की हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा माझ्यासोबत मला सल्ला देणारं कुणीच नव्हतं. माझ्या आयुष्यात सगळा मोठा ब्रेकडाऊन प्रेग्नेंसीनंतर झाला. मला आठवतय की,मी माझ्या शरीराविषयी आणि करिअरविषयी खूप वाईट विचार करायला लागले होते''.
''मी अशा नकारात्मक वातावरणात ओढले जात होते तिथून बाहेर परतणं मला कठीण वाटत होतं. मी संपूर्णपणे तुटले होते. मी स्वतःला घरात बंदिस्त करुन घेतलं होतं. इतरांशी बोलणं टाळत होते. मी लोकांपासून दूरावले अन् माझं मानसिक संतुलनही ढासळलं. यातून बाहेर यायला मला तीन वर्ष लागली''.
''आणि तेव्हापासून मग यातून बाहेर आल्यावर मी ठरवलं की.. मी अशा लोकांना मदत करणार ज्यांचा मानसिक पातळीवर संघर्ष सुरु आहे''.
समीरा रेड्डीला तिच्या वाढत्या वजनाला घेऊन खूप लोकांनी सुनावलं आहे.ती म्हणाली,''मी पूर्ण पूर्ण दिवस स्वतःला उपाशी ठेवायचे आणि एखादी इडली खायचे..कारण वजन वाढायला नको. मला अनेक लोकांनी चेहऱ्याची सर्जरी करण्याचा सल्ला दिला''.
''मला वाटतं की जवळपास १० वर्षआधी एक काळ असा आला होता की त्या काळात सर्जरी करायचं वेड लोकांना लागलं होतं..प्रत्येकजण बूब जॉब,नाक किंवा हाडांचे स्ट्रक्चर बदलताना दिसत होते. मला नेहमी माझ्या स्तनांवर पॅड लावावा लागायचा तेव्हा अनेकांनी मला बूब जॉब करायचा सल्ला दिला''.
१० वर्षापूर्वीचे ते दिवस आठवून समीरा म्हणाली,''अनेक वेळा मी विचार करायचे की मला हे करून घ्यायला हवं का? हा नियम आहे का ? एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःला प्रश्न केला की मला हे करणं गरजेचं आहे का? पण मी हे केलं नाही आणि यासाठी मी देवाची आभारी आहे की मी असं केलं नाही. कारण जर असं घडलं असतं तर आज मी ज्या आत्मविश्नासानं या विरोधात बोलतेय ते बोलू शकले नसते''.
समीरा आता एका नामांकित ब्रांड लिमिटलेस कॅम्पेनचा हिस्सा बनण्यास जात आहे. जो बॉडी पॉझिटिव्हीटवर भाष्य करणार आहे. या कॅम्पेन अंतर्गत सेक्स आणि प्लेजर म्हणजेच संभोग आणि आनंद यावर ती एका एपिसोडमध्ये चर्चा करणार आहे. समीरा यासंदर्भात म्हणाली, ''हा एक असा विषय आहे ज्याला उगाचच गंभीर समजलं जातं. मला वाटतं की हे चुकीचं आहे. यावर मोकळेपणानं बोललं जायला हवं''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.