समीरा रेड्डीने शेअर केली Weight loss journey, काय आहेत तिच्या टिप्स?

समीरा रेड्डीने शेअर केली Weight loss journey, काय आहेत तिच्या टिप्स?
Updated on

अभिनेत्री समीरा रेड्डीने (Sameera Reddy ) गेल्या एका वर्षात 11 किलो वजन कमी केले आहे. शुक्रवारी समीराने इंस्टाग्रामवर तिचे वजन ९२ किलोवरून ८१ किलो कसे कमी केले याबद्दल खुलासा केला.

"एक वर्षापूर्वी मी माझ्या फिटनेसला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. माझे वजन 92 किलो होते. आज माझे वजन 81 किलो आहे. पण मी नेहमी सांगते की वजन कमी झाले त्यापेक्षा माझी एनर्जी लेव्हल चपळता वाढवल्याबद्दल आभारी आहे..." तिने लिहिले.

समीराने तिच्या फिटनेस प्रवासात खालील काही गोष्टी पाळल्या:

1. माझे थोडे दुर्लक्ष होते पण मला याची जाणीव असल्यााने मी ताबडतोब रुळावर येते.

2. इंटरमिन्टेट फास्टिंग (Intermittent fasting) केल्याने मला रात्री उशिरा स्नॅकिंगच्या सवयीत मदत झाली आहे.

3. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी आणि शरीराने आनंदी राहण्यासाठी मी स्वत: वर खूप काम करते.

4. एक खेळ असा निवडा जो फिटनेस मजेदार बनविण्यात मदत करेल.

5. दर आठवड्याला तुमच्या प्रगती बद्दल तुम्हाला सांगणाऱ्या व्यक्ती सोबत मैत्री करा.

6. प्रॅक्टिकल गोल्स सेट करा.

7. लगेच वजन कमी करण्याचे ध्येय ठेवू नका.

8. स्वतःचा तिरस्कार करू नका.

9. कोणत्याही गोष्टीला तणाव येईपर्यंत महत्त्व देऊ नका.

समीरा रेड्डीने शेअर केली Weight loss journey, काय आहेत तिच्या टिप्स?
Rhea Chakraborty: 2 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा कमबॅक

"गेल्या एका वर्षात माझे फिटनेस बडी असल्याबद्दल धन्यवाद. मी पुढेही हे चालू ठेवण्यासाठी आणि तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे," तिने शेवटी सांगितले.

2014 मध्ये, समीराने उद्योगपती अक्षय वर्देशी (Akshai Varde) लग्न केले. या जोडप्याला हंस आणि न्यारा नावाची दोन मुलं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()