Samir Choughule: आम्ही शोकसभेचं स्कीट केलं आणि... समीर चौगुलेंनी सांगितला भन्नाट किस्सा

समीर चौगुलेंनी काही विनोदी स्कीट केल्याने लोकांच्या भावना कशा दुखावल्या, त्याचा एक किस्सा शेअर केलाय
samir choughule interview about how comedy act hurt people emotions
samir choughule interview about how comedy act hurt people emotions SAKAL
Updated on

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लोकप्रिय अभिनेते म्हणजे समीर चौगुले. समीर चौगुले यांनी आजवर विविध भुमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सिनेमा, नाटक, स्कीट अशा प्रत्येक माध्यमांमध्ये समीर चौगुलेंनी दखल घेण्यासारखं काम केलंय.

समीर चौगुले यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत काही विनोदी स्किट केल्याने लोकांच्या भावना कशा दुखावल्या, याचा खुलासा केलाय.

(samir choughule interview about how comedy act hurt people emotions)

samir choughule interview about how comedy act hurt people emotions
Vicky Kaushal: "तु माझा मुलगा..." साठ वर्षाची आजी फॅन! पुढे विकीने केलेल्या 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल

मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत समीर चौगुलेंनी हा किस्सा सांगितला. समीर चौगुले म्हणाले, आजकाल विनोद करणं हे खुप कठीण आहे. कोणत्याही गोष्टीने लोकांच्या भावना दुखवू शकतात.

मागे एक स्किट केलं होतं ज्यात असं म्हटलं गेलं की, डावखुऱ्या माणसाचं हस्ताक्षर चांगलं नसतं. तेव्हा काही डावखुरे लोक आमच्यावर नाराज झाले. याशिवाय आम्ही शोकसभेचं स्कीट केलेलं. ते खुप चांगलं झालं. पण काही लोकांनी आम्हाला फोन केला की आमच्या घरात कोणतरी गेलं. त्यामुळे आमचं स्कीट बघून ते Offend झाले

समीर चौगुले पुढे म्हणतात, "आजकाल काचेच्या भांड्यापेक्षाही जास्त नाजुक लोकांच्या भावना झाल्या आहेत. प्रत्येक वेळी आपण जे पाहतोय ते स्वतःच्या आयुष्याला लागू आहे, असं का समजतात लोकं. जुन्या काळात जे लेखक होते. त्यांनी जी पुस्तकं लिहून ठेवली. जे विनोद लिहून ठेवले. तसं त्यांना आजच्या काळात लिहीताच आलं नसतं." असं समीर चौगुले म्हणतात

समीर चौगुले वेळेच्या बाबतीत खुप वक्तशीर आहेत. त्यांचे गुरु विश्वास सोहोनी यांनी त्यांना नाटकाचं आणि वेळेचं महत्व सांगितलं. त्यामुळे वेळेत न येणाऱ्या कलाकारांची त्यांना चीड येते. समीर चौगुले यांनी पाच - सहा वर्ष किर्लोस्कर कंपनीत काम केलं. त्यांना तब्बल २५ हजार रुपये पगार होता. कंपनीत काम करता करता ते 'यदा कदाचित' नाटकांचे प्रयोग करायचे. पुढे बायकोने सपोर्ट केल्याने ते पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात सक्रिय झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.