अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar),मानुषी छिल्लर,सोनू सूद आणि संजय दत्त यांचा 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमागृहात ३ जून,२०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. फर्स्ट डे,फर्स्ट शो पहायला गेलेल्या प्रेक्षकांनी आता ट्वीटरवर 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) संदर्भात रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमारचा सिनेमा पाहिल्यावर त्याचा अभिनय,सिनेमाचं कथानक,सिनेमातील सेट्स पासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळ्याच गोष्टींवर सोशल मीडियावर चर्चा केली आहे.(Samrat Prithviraj' First Day First Show- Public Review- Twitter Review)
ट्वीटरवर 'सम्राट पृथ्वीराज' हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाला चंद्रप्रकाश द्विवेदीनं दिग्दर्शित केलं आहे. आणि यशराज प्रॉडक्शननं सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमासाठी तब्बल ३०० करोड रुपये खर्च करण्यात आल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा अक्षय कुमारसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण याआधी अक्षयचा 'बच्चन पांडे' बॉक्सऑफिसवर दणकून आपटला,आता पहायचं त्याचा 'सम्राट पृथ्वीराज' काय जादू करतो अन् अभिनेत्याचं झालेलं नुकसान कसं भरून काढतो.
अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमासाठी अजय देवगणनं देखील खास पोस्ट केली आहे.
सिनेमाच्या व्हिज्युअल्स पासून ते परफॉर्मन्सपर्यंत सगळ्याच गोष्टींची प्रेक्षक प्रशंसा करताना द्वीटरवर दिसत आहेत.
अक्षय कुमारच्या अभिनयाची विशेषतः खूप प्रशंसा करण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या सिनेमाला प्रेक्षक 'पैसा वसूल' म्हणताना दिसत आहेत.
या सिनेमातील संजय दत्तच्या व्यक्तिरेखेलाही खूप नावाजलं जात आहे.
पण असं असताना काही प्रेक्षकांनी सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाला विचारलेला एक प्रश्न सध्या चर्चेत येतोय. लोकांनी प्रश्न केला आहे की ते राजा शिवाजी आणि महाराणा प्रताप यांना हिंदू सम्राट नाही मानत का?
'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपले रिव्ह्यू (Review) सोशल मीडियावर(Social media) पोस्ट केले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद 'सम्राट पृथ्वीराज'ची पुढची बॉक्सऑफिसवरील घोडदौड किती यशस्वी ठरवतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.