bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून सातवा सदस्य घराबाहेर पडला. काल घरातून समृद्धी जाधवची एक्झिट झाली. यावेळी समृद्धीच घराबाहेर होती असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता, त्यामागे काही कारणेही होती आणि तिचा खेळही काहीसा डाऊन झालेला वाटला.
(samruddhi jadhav eliminated form Bigg Boss Marathi 4)
काल समृद्धी वहेर पडल्यानंतर हा निर्णय प्रेक्षकांनाही आवडला, कारण गेली काही दिवस ती प्रचंड अस्वस्थ होती. तिचा आत्मविश्वास कुठेतरी हरवल्या सारखा वाटत होता. सुरुवातीला समृद्धी ग्रुप 'ए'मध्ये होती. म्हणजेच अपूर्वा- अक्षयच्या ग्रुप मध्ये होती. तिथे तिने चांगली खेळी दाखवली. पण तू अपूर्वाच्या सावलीत खेळतेस, तुझं कुणी ऐकत नाही तिथे.. अशा कमेंट तिलाही बऱ्याच गोष्टी खटकल्या.. शेवटी टी ग्रुप मधून बाहेर पडली.
त्याच वेळी टीम 'बी' मधून वैतागूण यशश्री मसुरकर बाहेर पडली आणि यशश्री. समृद्धी यांनी रोहित शिंदेला सोबत घेऊन एक वेगळा ग्रुप बनवला. पण झाले असे की, रोहित त्यांच्या टीम मध्ये असला तरी रोहित स्वतःची वेगळी खेळी खेळतो, एक वैयक्तिक स्पर्धक म्हणून. त्यामुळे यशश्री आणि समृद्धीपुढे मोठे आव्हान होते. त्यात गेल्या आठवड्यात यशश्री घराबाहेर पडली. त्यामुळे समृद्धीचा मोठा आधार गेला, असे प्रेक्षकांना वाटते.
त्यामुळे टास्क मध्येही तिचे दुर्लक्ष होत होते. परिणामी तीचा खेळ डाउन झाला होता, अखेर ती काल रविवारी चावडीच्या दिवशी घराबाहेर पडली. समृद्धीने जाताना सर्वांचा आनंदात निरोप घेतला. जवळपास पन्नासहून अधिक टी बिग बॉसच्या घरात राहीली. एवढेच नाही तर बिग बॉसच्या घरात कॅप्टन होण्याचा पहिला मान तिनेच पटकावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.