'एवढं शिकून उपयोग काय?' हिजाबवरून ट्रोल करणाऱ्याला सनाचं सडेतोड उत्तर

धर्माचं कारण देत सनाने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता.
Sana Khan
Sana KhanInstagram
Updated on

अचानक अभिनय क्षेत्र सोडल्यामुळे चर्चेत आलेल्या सना खानला Sana Khan इन्स्टाग्रामवर तिच्या एका फोटोवरून ट्रोल करण्यात आलं. या फोटोमध्ये सनाने हिजाब परिधान केला आहे. 'पडद्याआड राहायचंच असेल तर तुझा एवढं शिकून काय उपयोग', असा सवाल एका नेटकऱ्याने तिला केला. सनाने गेल्या वर्षी अभिनय क्षेत्र सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर तिने अनस सय्यदशी निकाह केला. (Sana Khan slams troll who mocked her hijab and asked why she even got an education)

हिजाबवरून नेटकऱ्याने केलेल्या कमेंटवर सनाने त्याला सडेतोड उत्तर दिलं. 'जर मी पडद्याआड राहून माझी सर्व कामं करू शकतेय, मला इतका चांगला पती आणि सासरची मंडळी मिळाली आहेत, तर मग मला आणखी काय पाहिजे? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अल्लाह माझं सर्वप्रकारे रक्षण करत आहेत आणि मी माझं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं आहे. त्यामुळे हे सर्व माझ्या फायद्याचंच नाही का?'

Sana Khan
त्या रात्री नेमकं काय झालं? जामिनावर सुटलेल्या करणचं स्पष्टीकरण

धर्माचं कारण देत सनाने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. 'गेली अनेक वर्षे मी या झगमगत्या इंडस्ट्रीत काम केलं. इथे मला पैसा, प्रसिद्धी, चाहते सर्वकाही मिळालं. पण आता मी माझं पुढील आयुष्य समाजकार्यासाठी आणि धर्माने सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी व्यतित करणार आहे', असं तिने लिहिलं होतं. ही पोस्ट लिहिल्यानंतर महिन्याभरात तिने अनसशी निकाह केला.

'बिग बॉस ६', 'खतरों के खिलाडी ६' या रिअॅलिटी शोमध्ये सना झळकली होती. तिने 'हल्लाबोल', 'जय हो', 'वजह तुम हो' आणि 'टॉयलेट : एक प्रेम था' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर मेल्विन लुईसशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र सना अभिनय क्षेत्र सोडण्याआधी त्यांचं ब्रेकअप झालं.

Sana Khan
'या' अभिनेत्री ठरल्या होत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.