संदीप पाठक आंतराष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी

अभिनेता संदीप पाठक याला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'काऊच फिल्म फेस्टिवल' मध्ये 'राख' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
sandeep pathak
sandeep pathakgoogle
Updated on

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिहेरी माध्यमात आपल्या अभिनयाने चौकार षटकार लागवणारा अभिनेता संदीप पाठक याने मनोरंजन विश्वात कायमच स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. सध्या तो करत असलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे प्रयोग वाऱ्याच्या वेगाने सुरु आहेत. रसिकांचे भरभरून प्रेम या नाटकाला मिळत असून नवीनवीन भूमिकांमधून संदीप लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पण सध्या चर्चा आहे ती त्याला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची.

sandeep pathak
'कोंबडी पळाली...' पुन्हा पडद्यावर! केदार शिंदे घेऊन येतोय 'जत्रा 2'

संदीप पाठक (sandeep pathak) याने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२' (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला आहे. 'राख' या मराठी चित्रपटात संदीपने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

sandeep pathak
Photo Story : सेलिब्रेटींनी उभारली गुढी; पाहा गुढीपाडव्याचे खास क्षण

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा 'डिर्क मोहर' आणि अमेरिकेचा 'डोनॅटो डि'लुका' हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपने हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवले आहे. हा 'सायलेंट मुव्ही' या धाटणीचा हा चित्रपट असून राजेश चव्हाण यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात संवादाविना संदीपने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले.

sandeep pathak
Photos : पाडव्यानिमित्त गिरगावात ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा

'हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. 'राख' च्या संपूर्ण टिमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. ‘'राख'’मधील माझ कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असल्याने यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच आहे,' अशी प्रतिक्रिया संदीप पठाण याने विजयानंतर दिली.

संदीपनं 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'रंगा पतंगा', 'ईडक', 'एक हजाराची नोट' आदी ५० हून अधिक चित्रपटांच्या जोडीला विविध नाटकांचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग आणि पंचवीसपेक्षाही जास्त टीव्ही शोच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. लवकरच संदीपचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात त्याची वेगवेगळी रुपे पहायला मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()