Sangeet Devbabhali: बये, निघालीस? संगीत देवबाभळी निरोप घेत असतानाच लेखक भावुक म्हणाला...

संगीत देवबाभळी नाटक गेली ६ वर्ष रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करतंय
sangeet devbabhali natak stop writer prajakt deshmukh emotional post viral
sangeet devbabhali natak stop writer prajakt deshmukh emotional post viral SAKAL
Updated on

Sangeet Devbabhali: संगीत देवबाभळी नाटक कार्तिकीच्या एकादशीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांचा निरोप घेतंय. संगीत देवबाभळी नाटकाने गेली ६ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करुन रंगभूमी गाजवली. संगीत देवबाभळी नाटक पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक नाट्यगृहात पुन्हा पुन्हा हाऊसफुल्ल गर्दी करत होते.

या नाटकाचा शेवटचा प्रयोग बुधवारी, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.

त्यानिमित्ताने नाटकाचा लेखक - दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने नाटक निरोप घेताना खास पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केलीय.

sangeet devbabhali natak stop writer prajakt deshmukh emotional post viral
Emmy Awards 2023: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, वीर दास, एकता कपूरने पटकावला पुरस्कार

प्राजक्तने निरोपाचं पत्र लिहीलंय. प्राजक्त लिहीतो,

निरोपाचं पत्र

बये ,

निघालीस? ये !

जाणा-याला थांब म्हणू नये. जाणा-याला कुठं निघालीस विचारू नये. अवचित आलीस. पण जातांना मात्र सतत जाणार, निघणार, निघते, गेलेच असं सांगत राहिलीस आणि आता हा निरोपाचा क्षण.

तू माया लावलीस. आपण बीज लावतो. झाड वाढवतो. झाडाला हवं नको ते पुरवतो. पण एका क्षणी कळतं की आपण नसतोच झाड वाढवत. ते वाढतं. उलट त्यानं कल्पवृक्ष होऊन पोटाशी धरावं. तुमच्याच इच्छा पूर्ण करतं.

प्राजक्ता पुढे लिहीतो, "बये, नाटक का थांबवताय, हा प्रश्न चहुबाजूने आला. काय सांगू त्यांना? नाटकवाल्यांचं ठरलेलं खोटं पण सत्याची शपथ घातलेलं उत्तर देऊ? ‘लवकरच’.

पण आता तेही नकोच. निग्रहाने जाणा-याला

पाय अडकेल असंही बोलू नये.

मी बाहेर सांगतोय की

“ दोन भेटीत अंतर असलं की आवेगानं भेटता येतं. म्हणून जातेय तू. नव्या रूपात, नव्या नाटकातून भेटी होतीलंच. पण नाटक खरंच थांबत असतं का?

खरं तर नाहीच.

एखादा दीनानाथचा ,

किंवा कालिदासचा,

बहुतेक बालगंधर्वचा,

किंवा यशवंतचा,

बहुदा घोरपडेचा.

एखादा गडकरीचा..

सांगणा-यांच्या सांगण्यात नाटकाचा प्रयोग चालु राहतो.

न पाहिलेल्यांच्या कुतूहलात तो प्रयोग चालु राहतो.”

तू कुणाच्या लेखणीतून आलीस म्हणून त्याची नव्हती, नी कुणी तुला सादर केलं म्हणून तू त्यांची नव्हती."

प्राजक्त पुढे लिहीतो, "तूच धारण केलं होतंस आम्हाला आणि आता निघाली आहेस. हेच खरं. बरं महाराष्ट्राचा निरोप म्हणजे बाहेर भेटणार का? माहिती नाही. मग कुठे, कधी भेटणार? माहिती नाही. कशाचंच उत्तर माहिती नाहीए तर निरोपच ना हा? मी समजून घेतो. गेल्यावेळी फसवलंस. सांगून निरोप घेतल्यावर त्रास कमी होतो असं तुकाराम बीजेला खोटं सांगितलंस. अचानक निरोप घेतला की एकच निरोप ठरतो. पण तारीख सांगून घेतला की रोजची पानगळ. पण एक एक पान खुडत जावं तर झाड बोडखं होतं. इथं बहर आलाय. दुपटीनं. खोटं तरी कसं म्हणावं.

जाऊ देतो, पण मी जेव्हा जेव्हा नवं काही रंगमंचावर करेन ते ह्याच तादात्म्याने करेन. तेव्हा तू येऊन धारण करशील हा शब्द दे.

बरं ऐक..तुझ्याकडून उत्तर येणार नाहीच हे माहीती आहे म्हणून गाथा उघडून ठेवलीय मी माझ्या खिडकीपाशी. खिडकीही उघडी ठेवलीय. आता बावीस तारखेला वारं येईल. पानं फडफडतील. तेव्हा कोणत्या पानावर हे वारं थांबलेलं असेल तेही मला आताच ठाऊक आहे.

तुमची आमची हेचि भेटी ।

येथुनिया जन्मतुटी ॥

आता असो द्यावी दया ।

तुमच्या लागतसे पाया ॥

आम्ही जातो अमुच्या गावा

अमुचा राम राम घ्यावा ॥

बये,

निघालीस? ये !

आठवणीत तेवढी ओळख देत रहा मात्र.

तुझा

प्राजक्त"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()