Sanjay Dutt First Choice For The Role Of Kattappa: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून नेहमीच बाहुबलीचे नाव घेतले गेले आहे. भारतीय चित्रपट विश्वात सर्वोत्तम चित्रपटामध्ये देखील बाहुबलीचे नाव आहे. आजवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव घेतले जाते.
ज्यांनी एस एस राजामौली (S.S.Rajmouli) दिग्दर्शित बाहुबली पाहिला असेल त्यांना त्यातील कटाप्पा नावाची व्यक्तिरेखेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. प्रसिद्ध अभिनेता सत्यराज(Satyaraj) यांनी ती भूमिका वठवली होती. मात्र त्यापूर्वी ही भूमिका संजय दत्त साकारणार होता (Sanjay Dutt Choice OF Kattappa) अशा चर्चेला आता उधाण आले आहे. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ संजय दत्तनं त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या नावाची मोहोर प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता सध्या संजय दत्त त्याच्या आगामी काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडे काही विनोदी चित्रपट आहेत. त्यात तो दिसणार आहे. २०१५ आलेल्या बाहूबली चित्रपटातील एक मोठी गोष्ट आता समोर आली आहे.राजामौली यांचे वडील आणि बाहूबली चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
विजयेंद्र यांनी म्हटले आहे की, पहिल्यांदा कटाप्पाच्या भूमिकेसाठी सत्यराज नव्हे तर संजय दत्त (Sanjay Dutt)चे नाव चर्चेत होते. प्रभासच्या बाहूबलीनं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तब्बल पावणे दोन हजार कोटींची कमाई केली होती. २०२० मध्ये रेडिफवर बातचीत करताना विजयेंद्र प्रसाद यांनी एक वेगळीच गोष्ट सांगितली होती.
म्हणून संजय दत्तचे नाव झाले कट...
विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, बाहूबलीच्या भूमिकेसाठी आमची पहिली पसंती ही नेहमीच प्रभासला होती. त्यानंतर कटाप्पाच्या भूमिकेसाठी संजय दत्तचे नाव चर्चेत होते. मात्र त्यावेळी तो जेलमध्ये होता. त्यामुळे तो या चित्रपटासाठी वेळ देऊ शकेल याबद्दल आम्हाला शंका होती. त्यावेळी त्याच्या सोबत काम करणं अवघड होतं. आमच्याकडे सत्यराज हा दुसरा ऑप्शन होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.