Sankarshan Karhade: "६ दिवस , २१ विमान प्रवास , १३ शहरं", संकर्षणने सांगितला अमेरिका नाटक दौऱ्याचा भन्नाट अनुभव

संकर्षण कऱ्हाडेने नुकतंच मराठी नाटकाच्या अमेरिका दौऱ्याचा भन्नाट अनुभव सांगितला आहे
sankarshan karhade shared his experience of america marathi natak niyam va ati lagu
sankarshan karhade shared his experience of america marathi natak niyam va ati laguSAKAL
Updated on

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षण सोशल मिडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. संकर्षणने नुकतंच एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने अमेरिका दौऱ्यावर त्याला आलेला अनुभव शेअर केलाय.

संकर्षणने तब्बल ६ दिवस अमेरिकेत नियम न अटी लागू या त्याच्या नाटकाचे प्रयोग केले. यात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे सहभागी आहे. या नाटकाच्या दौऱ्याचा अनुभव संकर्षणने सोशल मिडियावर शेअर केला.

(sankarshan karhade shared his experience of america marathi natak niyam va ati lagu)

sankarshan karhade shared his experience of america marathi natak niyam va ati lagu
Gadkari Teaser: "या देशाची ओळख इथल्या रस्त्यांनी होईल तेव्हा..!", कोण साकारणार नितीन गडकरींची भूमिका?

संकर्षणने अमेरिका नाटकाच्या दौऱ्यातला एक व्हिडीओ फोटो शेअर केलाय. यात त्याच्या हातात भारताचा आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. हा फोटो शेअर करुन संकर्षण लिहीतो, "अमेरिका थँक यू 🇺🇸 LOVE YOU भारत. नियम व अटी लागू नाटकाचा आज अमेरिकेतला १३ प्रयोगांचा दौरा संपूर्ण झाला.. आजच्या टम्पाच्या प्रयोगाला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला.
एकुण ३६ दिवस , २१ विमान प्रवास , हजारो मैलांचं अंतर , १३ शहरं , नाटकाच्या सगळ्या प्रयोगांना मिळुन आलेले , भेटलेले , जवळपास ५००० मराठी रसिक प्रेक्षक आणि मिळालेलं अगणित प्रेम

संकर्षणने पुढे लिहीतो, "अमेरिकेच्या ह्या दौऱ्यात खूप प्रेम मिळालं. नाटक सग्गळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रयोगाच्या निमित्ताने १३ वेगवेगळ्या शहरांतल्या मराठी कुटुंबांच्या घरी राहाता आलं.. त्यांनी खूप प्रेम दिलं…. काही ठिकाणी माझ्या घरच्या सारखा गणेसोत्सव होता , तर काही घरांतल्या हातची चव अगदी माझ्या आईच्या हातची.. काही ठिकाणी औक्षण करुन स्वागत झालं तर , काही ठिकाणी निरोप द्यायला सगळं कुटुंब दारात ऊभं बघून मलाही रडू आलं.. कामासाठी , नोकरीसाठी , कुटुंबासाठी आपल्या “भारतापासून” सातासमुद्रापार असलेली हि सगळी मराठी माणसं , कुटुंब त्यांच्यातली रसिकता पूरेपूर टिकवून आहेत …. हे सगळं समृद्ध करणारं आहे.."

संकर्षणने शेवटी लिहीले, "ह्या सगळ्यासाठी THANK YOU अमेरिका 🇺🇸 आणि आता उद्या सुरू होणार परतीचा प्रवास आपल्या भारताकडे…🇮🇳 फार फार आठवण येतीये. आता कान आतूर झालेत ऐकायला कि , “कुछ ही समय बाद हमारा विमान मुंबई के छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर उतरेगा.. ११ oct ला पहाटे पोचतो आणि मग भेटूच."

संकर्षणच्या नाटकाला केवळ भारतात नव्हे तर परदेशात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालाय. संकर्षणचा तीन अडकून सीताराम सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.