Sanskruti Balgude: शुभंकर - संस्कृती बालगुडेच्या '८ दोन ७५' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, या महत्वाच्या विषयाची मांडणी

संस्कृती बालगुडेच्या आगामी सिनेमातून महत्वाचा विषय समोर येणार आहे
sanskruti balgude and shubhankar tawde 8 don 75 marathi movie trailer
sanskruti balgude and shubhankar tawde 8 don 75 marathi movie trailerSAKAL
Updated on

मराठी मनोरंजन विश्वात सध्या विविध विषयांवरचे सिनेमे भेटीला येत आहेत. नवीन वर्षात सत्यशोधक, पंचक आणि ओले आले हे तीन सिनेमे रिलीज झाले. आता चित्रपटसृष्टीत "८ दोन ७५" निमित्ताने आणखी एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा रिलीज होणार आहे. "८ दोन ७५" म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.

sanskruti balgude and shubhankar tawde 8 don 75 marathi movie trailer
Indian Police Force: अशी झाली सिद्धार्थची 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये एन्ट्री, रोहित शेट्टीचा खुलासा

"८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा "८ दोन ७५": फक्त इच्छाशक्ती हवी! सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

sanskruti balgude and shubhankar tawde 8 don 75 marathi movie trailer
Satyashodhak: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत. हा चित्रपट आता १९ जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()