मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा जागतिक स्तरावर सन्मान

'चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप भारी गोष्ट आहे',अशी प्रतिक्रिया संस्कृतीनं दिली आहे.
Sanskruti Balgude
Sanskruti BalgudeGoogle
Updated on

अभिनेत्री संस्कृती बालगुडेला (Sanskruti Balgude) तिच्या अभिनयासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाची थाप मिळतेय. ‘८ दोन ७५’ ह्या चित्रपटातल्या तिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या गेलेल्या या चित्रपटाने संस्कृती बालगुडे फक्त सौंदर्यवतीच नाही आहे, तर ती एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असण्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Sanskruti Balgude
शाळेतल्या शिक्षिकेला चावला म्हणून 'टायगर' नाव पडलं; खरं नाव वेगळच...

इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्टअभिनेत्री, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री अशा चार निरनिराळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये चार पुरस्कारांनी तिला भुषवण्यात आलंय.

Sanskruti Balgude
नागराज के 'झुंड' ने हमे 'फुटबॉल' जैसे उडाया; आमिरची थेट प्रतिक्रिया

या पुरस्करांनी भारावुन गेलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे ह्याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाली, “जगभरातल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमच्या सिनेमाला 65 हून अधिक पुरस्कार मिळालेत. गेली दोन वर्ष सिनेमाविश्व थांबलं होतं आणि ते सुरू झाल्यानंतरची ही अत्यंत गोड बातमी आहे. सिनेमाचा विषय वेगळा आहे. आणि त्याचं जे कौतुक होतंय, त्यानेच मी खूप भारावून गेले होते. मला वैयक्तिक पुरस्कारांची अपेक्षा नव्हती. पण सिनेमाचाच फक्त गौरव होत नाही आहे तर मलाही चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप भारी गोष्ट आहे. हे अविश्वसनीय आहे. माझे हे पहिले-वहिले आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.”

Sanskruti Balgude
मध्यरात्री 'ब्रह्मास्त्र'च्या टीमची तातडीची मीटिंग! कारण ऐकाल तर...

संस्कृती पुढे म्हणते, “महिला सशक्तीकरणाला सलाम करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ आलाय. आणि माझी ही सशक्त व्यक्तिरेखा सध्या पुरस्कारांनी गौरवली जातीय. शब्दात व्यक्त करण्या पलीकडची ही अनुभूती आहे. आता माझीच माझ्याकडून अपेक्षा वाढलीय. आता सातत्याने उत्तमोत्तम काम करायला हवीत. ”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.