सुरुवातीला सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर सैफ-अमृताची मुलगी अशी ओळख असलेली सारा अली खान हिनं आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. २०१८ मध्ये तिने 'केदारनाथ' या सिनेमातनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर 'सिम्बा','लव्ह आज कल','कुली नंबर वन' या सिनेमांमध्येही तिची वर्णी लागली. तिचा अभिनय जितका सहज आहे तितकंच तिचं नृत्यही लाजवाब आहे. पडद्यावर तिला पाहणं प्रेक्षकांसाठी एक सुंदर मेजवानीच असते. पहिल्याच सिनेमात पडद्यावर तिच्या अभिनयाच्या माध्यमातनं दिसलेला आत्मविश्वास तिचं करिअर मोठं असणार यावर शिक्कामोर्तब करून गेलं. आज ती केवळ अभिनयामुळेच नाही तर तिच्या वागण्यातील-बोलण्यातील नम्रतेमुळेही फेव्हरेट अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दाखल झाली आहे.
सारानं केदारनाथमध्ये सुशांत सिंग राजपूतबरोबर काम केले आहे. सुशांत बॉलीवूडमधला तिचा पहिला हिरो होता. या सिनेमात या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री सिनेमाला यश मिळवून देण्यात कारणीभूत ठरली होती. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं सारा आणि सुशांत जेव्हा-जेव्हा मीडियासमोर यायचे तेव्हा-तेव्हा सारा सुशांतच्या सहकार्याविषयी आवर्जून बोलायची. सुशांतने कसे आपल्याला सहज अभिनयाचे धडे दिले,हिंदी भाषा शुद्ध कशी बोलावी हे शिकविले याचा ती पाढाच वाचायची. सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने त्यांच्यात चांगली मैत्रा झाली होती. १४जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतनं त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा काही गोष्टींचा छडा लावण्याच्या उद्देशाने एनसीबीने सारालाही चौकशीसाठी बोलविले होते. तेव्हा साराने आपण केदारनाथच्या वेळी सुशांतच्या अधिक जवळ आलो होतो,आपण रीलेशीपमध्ये होतो असे सांगितले होते. पण पुढे काही गोष्टी न पटल्यामुळे आपण विभक्त झालो असेही तिने एनसीबीला दिलेल्या जबाबात नोंदवले होते. त्यानंतर सुशांत संदर्भात कुठलंही वक्तव्य करायला धजावणा-या सारानं आज खूप दिवसांनी सुशांतच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये सारा म्हणतेय,''आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी माझं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. माझी पहिली आणि माझ्या जवळची फिल्म केदारनाथ प्रदर्शित झाली. मला माहीत नाही केदारनाथ विषयी मला काय वाटतं हे योग्य शब्दात व्यक्त करू शकेन की नाही. पण आज मी खरंच मन्सूरला मिस करतेय. मी जे काही चांगलं करू शकले ते सुशांतमुळेच. त्यानं केलेलं सहकार्य,मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचं आहे. या सिनेमातली 'मुक्कू' मी लोकांच्या मनापर्यंत पोहोचवू शकले ते केवळ सुशांतने साकारलेल्या मन्सूरमुळेच. तिने केदारनाथच्या रीलिज डेटच्या निमित्ताने केदारनाथ सिनेमाचा प्रवास आणि सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.