Sarath Babu Health Update: व्हेंटिलेटरवर आहे 'हा' सुपरस्टार! प्रकृती चिंताजनक..

Sarath Babu Health Update
Sarath Babu Health UpdateEsakal
Updated on

दक्षिणेतील दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांची तब्येत बिघडली आहे. 71 वर्षीय साऊथ स्टार यांना गंभीर अवस्थेत गचीबोवली येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सरथ बाबू व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

सरथ बाबू यांचे अनेक अवयव निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरथ बाबू हे सेप्सिस या आजाराने त्रस्त आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी बेंगळुरूहून हैदराबादला आणण्यात आले होतं.

सेप्सिस हा एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे अनेक अवयव निकामी होण्याचा धोका असतो. हा आजार जीवघेणा आहे. ताज्या माहितीनुसार, सेप्सिस आजारामुळे सरथ बाबू यांची किडनी, यकृत आणि फुफ्फुसावर या आजाराचा परिणाम झाला आहे.

Sarath Babu Health Update
Tamannaah Bhatia: कितीही लपवलं तरीही तमन्नाला अखेर पापाराझींनी बॉयफ्रेंडसोबत पकडलचं! व्हिडिओ व्हायरल

अलिकडच्या आठवड्यात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी अभिनेत्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकीकडे त्याच्या या आजारामुळे इंडस्ट्रीतील कलाकार चिंतेत आहे तर दुसरीकडे त्यांचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

Sarath Babu Health Update
Aryan Khan: पप्पाचा प्रोजेक्ट डायरेक्ट करतोय आर्यन! लाडक्या लेकाच्या करिअरसाठी शाहरुखची धडपड सुरुच

सरथ बाबू यांच्याबद्दल सांगायचे झाले तर बाबूचे खरे नाव सत्यम बाबू दिक्षितुलु आहे. 1973 मध्ये एका तेलुगु चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

ते मुख्यत्वे तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. सरथने काही कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. त्याला नऊ वेळा सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कार मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.