Satish Kaushik Bollywood Director Actor Passed Away : बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्युनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच सेलिब्रेटी, चाहते यांच्यावर मोठा आघात झाला आहे. भारतीय फिल्म विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी, चाहत्यांनी कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कौशिक यांच्या मृत्युची आता दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. अशी बातमी समोर येताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. कौशिक हे त्यांच्या फार्म हाऊसवर गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर त्यांना केव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी नेमकं काय घडलं, या गोष्टींचा पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
सतीश हे त्यांच्या मृत्युपूर्वी होळीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नही करण्यात आले मात्र त्यात यश आले नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या आकस्मिक मृत्युचे कारण शोधण्यासाठी तपास सुरु केला आहे.
त्या पार्टीमध्ये झाले काय?
दिल्ली पोलिस आता कौशिक ज्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते, आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड कसा झाला याचा तपास करत आहे. याशिवाय ज्या व्यक्तींनी कौशिक यांना रुग्णालयात दाखल केले होते त्यांचीही चौकशी केली जात आहे. ७ मार्च रोजी कौशिक हे प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी आयोजित केलेल्या होळीच्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. आज तकनं प्रसिद्ध केलेल्या एका बातमीमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, ते मोठ्या उत्साहानं या उत्सवात सहभागी झाले होते. त्या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कौशिक हे ८ मार्चला दिल्लीतील आपल्या कुटूंबासमवेत होळी साजरी करण्यासाठी आले होते. त्यांच्या फार्महाऊसवर ते गेले असताना त्यांना रात्री अकराच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वेगानं त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आले. रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात नेण्यापूर्वी पोलिसांना तातडीनं कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कौशिक यांच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आले. याप्रकरणाचा बारकाईनं तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. कौशिक यांचे शवविच्छेदन झाले असून त्यातून कोणत्याही प्रकारची संशयास्पद माहिती मिळालेली नाही. त्यांना हदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एनआयनं दिलेल्या माहितीनुसार, कौशिक यांच्या मॅनेरजरचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. ते त्या रात्री साडेदहा वाजता झोपले होते. आणि दुसऱ्या दिवशी मला साडेबारा वाजता फोनही केला होता. मला श्वास घेण्यास अडचण होत असल्याचे सांगितले होते. अशी माहिती मॅनेरजनं दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.