Satish Kaushik: सतिश कौशिक यांनी बॉलीवूडच्या अनेक सिनेमांतून काम करत लोकांचे निखळ मनोरंजन केले. 'मिस्टर इंडिया'चा 'कॅलेंडर'..'दिवाना-मस्ताना' मधला 'पप्पू पेजर'...त्यांचा प्रत्येक रोल आयकॉनिक होता. आता तर दिल्ली पोलिसांनीही सतिश कौशिक यांना एकदम भावूक अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे.
दिल्ली पोलिसांची ही श्रद्धांजली वाचून प्रत्येकाच्या मनात दिग्ग्ज कलाकाराच्या सिनेमांचा फ्लॅशबॅक आला नाही तर नवल. दिल्ली पोलिसांच्या या पोस्टवर लोक देखील संदेश लिहित त्यांच्या आठवणीत भावूक झाले आहेत. (Satish kaushik death delhi police emotional tribute tweet)
आता समोर आलं आहे की सतिश कौशिक बिजवासन येथील फार्महाऊसवर होते जेव्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या मनॅजरनं सांगितलं की १२.१० च्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.
तेव्हा जवळच्याच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं. पण अखेर मृत्यूनं त्यांना कवटाळलं. ते दिल्लीहून आले होते म्हणून सर्वप्रथम दिल्ली पोलिसांना याविषयी सूचित केले गेले. या घटनेचा तपास सध्या सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी ट्वीटरवर सतिश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दिल्ली पोलिसांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की,''कुंज बिहारी,क्या बात थी तुम्हारी..
तुम्ही नेहमीच आमच्या कॅलेंडरमध्ये पेजर बनून कायम स्मरणात रहाल.
रेस्ट इन पीस सतिश कौशिकजी,
सतिश कौशिक यांचा ट्वीटमध्ये फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,सुनिए तो सही..थोडा रुकिये तो सही..''
हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...
यादरम्यान पोलिसांनी सतिश कौशिक यांच्या मृत्यूमागे काही कटकारस्थान तर नाही ना याचाही तपास करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पूर्ण दिवसांत सतिश कौशिक यांच्यासोबत काय काय घडलं याची माहिती सध्या पोलिस मिळवत आहेत.
सतिश कौशिक यांच्या मॅनेजरनं ANI ला दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे की ते बुधवारी रात्री १०.३० वाजता झोपायला निघून गेले होते. रात्री १२ नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली..तेव्हा मॅनेजरला बोलावण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.