Satyaprem Ki Katha Review: कार्तिक - कियाराची जादू पसरली, ऐन पावसाळ्यात वातावरण रोमँटिक, वाचा review

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सत्यप्रेम कि कथा सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती
Satyaprem Ki Katha twitter Review starring karthik aryan kiara advani directed by samir vidwans
Satyaprem Ki Katha twitter Review starring karthik aryan kiara advani directed by samir vidwans SAKAL
Updated on

Satyaprem Ki Katha review news: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सत्यप्रेम कि कथा सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा आज २९ जूनला थिएटरमध्ये रिलीज झालाय. सुरुवातीपासून या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती.

भूलभुलैया नंतर कार्तिक आणि कियारा या दोघांची लव्हेबल केमिस्ट्री सत्यप्रेम कि कथा मध्ये पाहण्यास सर्व आतुर होते.

अखेर हा सिनेमा आज २९ जूनला संपूर्ण देशात रिलीज झालाय. काय आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि twiiter review जाणून घ्या.

(Satyaprem Ki Katha twitter Review starring karthik aryan kiara advani directed by samir vidwans)

Satyaprem Ki Katha twitter Review starring karthik aryan kiara advani directed by samir vidwans
Madhurani Prabhulkar: यापुढे माझा काही संबंध नसेल... आई कुठे काय करते मधील मधुराणीने घेतला मोठा निर्णय

समीक्षक सुमित कडेल म्हणतो #SatyaPremKiKatha हा अलिकडच्या वर्षांत हिंदी मनोरंजन विश्वातला सर्वात परिपक्व आणि हार्ड हिटिंग रोमँटिक चित्रपट आहे.

दिग्दर्शन म्हणून समीरचा हा पहिलाच सिनेमा आहे.. तो किचकट विषय चपखलपणे हाताळतो. करमणुकीच्या भागाशी तडजोड न करता अतिशय सहजतेने तो हा गंभीर विषय आपल्यासमोर मांडतो.

याशिवाय प्रसिद्ध समीक्षक जोगिंदर तुटेजा म्हणतात.. प्रोमोमधून कथा अजिबात उलगडली नाही. विशेषत: कथेला मोठा ट्विस्ट जो हायलाइट आहे.

कार्तिक आर्यन इतका प्रिय आहे की तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. आजवरच्या कारकिर्दीची सर्वोत्तम भूमिका तो साकारतो. कियारा अडवाणी नेहमीप्रमाणेच मनमोहक आहे. सहाय्यक कलाकार सुद्धा मस्त काम करतात.

Satyaprem Ki Katha twitter Review starring karthik aryan kiara advani directed by samir vidwans
Kiran Mane on Leshpal Jawalge: प्रोटीन पावडर खाऊन जीम करणाऱ्यांनो.. किरण मानेंनी केलं लेशपालचं कौतूक

याशिवाय एका युजरने लिहिलंय की.. #SatyaPremKiKatha अतिशय सुंदरपणे संवेदनशील विषय हाताळतो. सामाजिक अपेक्षा, कुरूपता, समाजातील महिलांची भूमिका आणि स्थान, महत्वाकांक्षा असे अनेक विषय खुप सुंदरपणे हाताळतो.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी त्यांची पात्रे खूप छान वठवली आहेत! एकूणच ट्विटरवर सत्यप्रेम कि कथा सिनेमाचं खूप कौतुक होतंय.

ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांना हा सिनेमा आवडत आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करणार हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.