Satyashodhak Teaser: भिडेवाडा पुन्हा उजळणार, ज्योति - सावित्रीची कहाणी सांगणारा सत्यशोधक सिनेमाचा टीझर भेटीला

सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंची कहाणी सांगणारा सत्यशोधक सिनेमाचा टीझर भेटीला आलाय
satyashodhak movie teaser based on life mahatma jyotiba phule and savitribai phule released diwali 2023
satyashodhak movie teaser based on life mahatma jyotiba phule and savitribai phule released diwali 2023 SAKAL
Updated on

Satyashodhak Movie Teaser: महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया ज्यांनी रुजवला आणि स्त्रियांच्या मनात शिक्षणाची ज्यांनी गोडी लावली अशी असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले.

ज्योति - सावित्रीची हीच कहाणी आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. सत्यशोधक सिनेमाच्या माध्यमातुन ही कहाणी सर्वांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(satyashodhak movie teaser based on life mahatma jyotiba phule and savitribai phule)

satyashodhak movie teaser based on life mahatma jyotiba phule and savitribai phule released diwali 2023
The Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोमधील हा लोकप्रिय अभिनेता झाला पोरका, दोन महिन्यात आई - वडिलांचं निधन

सत्यशोधक सिनेमाच्या टीझरमध्ये काय?

विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. टीझरमध्ये पुण्यातील मिशनरी स्कूल दिसून येतंय. पुढे ज्योतिबा फुले शिक्षणाअभावी लोकांचे होत असलेले हाल बघतात. आणि मग माणसांना शिकवण्याचं ध्येय हाती घेतात.

धगधगत्या ज्वाळेतुन ज्योतिबा फुले चालत आलेले दिसतात. एकुणच सत्यशोधक सिनेमाचा टीझर पाहून अंगावर काटा उभा राहतो

हे कलाकार साकारणार महात्मा फुले आणि ज्योतिबा फुलेंची भुमिका

सत्यशोधक चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत, तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत.

या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि महात्मा जोतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक अमित राज यांचे कर्णमधुर संगीत लाभले असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर फातर्फेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.

या दिवशी सत्यशोधक सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे,प्रतिका बनसोडे आणि प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट दिवाळी 2023 मध्ये आपल्या भेटीस येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.