Sayaji Shinde Birthday : एकेकाळी वॉचमन होते सयाजी शिंदे.. आज मराठीसह साऊथ इंडस्ट्रीत आहे जलजला

हिंदी,मराठी तसेच साऊथ सिनेमांमधून महत्वाची भूमिका निभावणारे अभिनेते सयाजी शिंदे लोकप्रिय आहेत.
Sayaji Shinde Birthday : एकेकाळी वॉचमन होते सयाजी शिंदे.. आज मराठीसह साऊथ इंडस्ट्रीत आहे जलजला
Sayaji Shinde Birthday : एकेकाळी वॉचमन होते सयाजी शिंदे.. आज मराठीसह साऊथ इंडस्ट्रीत आहे जलजला Sayaji shinde work as a watchman during his struggle days
Updated on

Sayaji Shinde Birthday: हिंदी,मराठी तसेच साऊथ सिनेमांमधून महत्वाची भूमिका निभावणारे अभिनेते सयाजी शिंदे लोकप्रिय आहेत. सयाजी शिंदेंच्या दमदार भूमिकेने सर्वांना त्याच्या अभिनयाचे कौतुक वाटते.

सयाजी शिंदेंनी जेवढी विलनची दमदार भूमिका केली तेवढीच ताकदीची भूमिका त्यांनी एका सभ्य माणसाची केली. सयाजी शिंदे आज प्रसिद्ध अभिनेते असले तरी एकेकाळी त्यांनी वॉचमन म्हणून काम केलंय. आज सयाजी यांचा वाढदिवस.

सुरुवातीच्या काळात मावशी आणि बहिणीच्या सहाय्याने सयाजी यांनी १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी D Ed करायचा विचार केला. त्यानंतर सरकारच्या जलसंपदा खात्यात त्यांना वॉचमन म्हणून नोकरी मिळाली.

घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी 1978 ते 1980 अशा 3 वर्षात ही वॉचमनची नोकरी केली. मग पुढे सयाजी शिंदे यांनी पूर्ण शिक्षण घेऊन मराठी विषयात ग्रॅज्युएशन केलं.

Sayaji Shinde Birthday : एकेकाळी वॉचमन होते सयाजी शिंदे.. आज मराठीसह साऊथ इंडस्ट्रीत आहे जलजला
Gandhi Godse Ek Yudh : "रस्त्यावर उतरून भेळपूरी खायला जाल तरी वाद होतील"

सयाजी शिंदे आज ६५ वर्षांचे झाले आहेत. शुटिंमधून वेळ मिळाला कि सयाजी शिंदे निसर्गाच्या सानिध्यात रमतात. त्यांनी २०२३ मध्ये हेमंत आवाडे दिग्दर्शित 'घर, बंदूक, बिर्याणी' या मराठी सिनेमात सयाजी शिंदे झळकले. या सिनेमात नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. याशिवाय त्यांनी प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमात काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.